न्यूयॉर्क: अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरमध्ये राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड पाहायला मिळाला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न झालं. त्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड पाहायला मिळाला. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर न्यूयॉर्कमधल्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथे प्रभ रामचंद्रांचं छायाचित्र झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र टाईम्स स्क्वेअरमधील बिलबोर्ड्सवरील जाहिरातीचं काम सांभाळणाऱ्या कंपनीनं यास नकार दिला होता. अमेरिकेतल्या मुस्लिमांनी या प्रकरणात विरोध दर्शवत मोहीम हाती घेतल्यानं जाहिरात कंपनीनं प्रभू रामाचे फोटो झळकण्यास असमर्थतता दर्शवली. मात्र आज अचानक टाईम्स स्क्वेअरमध्ये प्रभू रामचंद्र, अयोध्येतील राम मंदिर आणि भारताचा झेंडा फडकला. ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या भारतीयांना सुखद धक्का बसला.
VIDEO: शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! टाईम्स स्क्वेअरमध्ये जय श्रीराम; बिलबोर्ड झळकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 21:06 IST