शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान?; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:43 IST

चिनी संरक्षणमंत्र्यांकडे रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष; राजनाथ सिंह यांच्या आसपास मात्र मोठ्या संख्येनं अधिकारी उपस्थित

मॉस्को: पूर्व लडाखमधील तणाव गेल्या चार महिन्यांपासून कायम असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंहरशिया दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहीदेखील रशियाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र दौऱ्यादरम्यान सर्व व्यासपीठांवर फेंगही यांच्या तुलनेत सिंह यांना जास्त प्राधान्य मिळालं आहे. सिंह यांचं रशियात झालेलं स्वागत पाहता यजमान देशानं चीनच्या तुलनेत भारतासोबतच्या मैत्रीला जास्त महत्त्व दिल्याचं स्पष्ट झालं आहे.रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणाररशिया दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विविध बैठकांना उपस्थित होते. यावेळी वेई फेंगही सगळ्याच ठिकाणी त्यांच्या मागून चालताना दिसत होते. सिंह आणि फेंगही एकाचवेळी सैन्य स्मारकाजवळ पुष्पचक्र वाहण्यासाठी गेले. त्यावेळी रशियाच्या लष्कराचे अधिकारी सिंह यांच्या दोन्ही बाजूंना उपस्थित होते. मात्र फेंगही यांना इतकं महत्त्व दिलं गेलं नाही. फेंगही यांच्यासोबत रशियाचे फारसे अधिकारी नव्हते. फेंगही यांच्यासोबत पाकिस्तानचे जनरलदेखील चालत होते. मात्र त्यांच्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. रशियन लष्कराच्या अधिकाऱ्यांचं संपूर्ण लक्ष राजनाथ सिंह यांच्याकडेच होतं.शत्रुत्वापेक्षा माणुसकी मोठी; भारतीय जवान धावले चिनी नागरिकांसाठी, १७५०० फुटांवरून सुखरुप सुटकाएससीओच्या बैठकीआधी राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच देशांचे संरक्षणमंत्री एका चर्चमध्ये गेले. या ठिकाणीही चिनी संरक्षणमंत्री फेंगही दुर्लक्षितच राहिले. लष्कराच्या सर्वात मोठ्या चर्चमध्येही फेंगही यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. यावेळी रशियाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत होते. रशियन संरक्षणमंत्री केवळ राजनाथ सिंहांशी बोलत होते. यावेळी चिनी संरक्षणमंत्री मागून चालत होते.भारताचा चीनला आणखी एक धक्का; 'त्या' औषधावर आता अँटी-डंपिंग ड्युटी लागणारसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षणमंत्र्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनीदेखील तेच केलं. विशेष म्हणजे चीन एससीओचा संस्थापक सदस्य आहे. तर भारत २०१७ मध्ये एससीओचा सदस्य झाला आहे. मात्र तरीही रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ भारतीय संरक्षणमंत्र्यांना प्राधान्य दिलं. राजनाथ सिंह रशियातील प्रत्येक व्यासपीठावर चिनी संरक्षणमंत्र्यांशी अंतर राखून होते.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहrussiaरशियाchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव