न्यूयॉर्कमध्ये रेल्वेचा अपघात, 90 जखमी
By Admin | Updated: January 4, 2017 22:18 IST2017-01-04T20:06:14+5:302017-01-04T22:18:41+5:30
न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन शहरामध्ये सकाळी प्रवाशांना घेऊन जाणारी रेल्वे रुळावरुन घसरुन अपघात झाला. या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

न्यूयॉर्कमध्ये रेल्वेचा अपघात, 90 जखमी
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 04 - न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन शहरामध्ये सकाळी प्रवाशांना घेऊन जाणारी रेल्वे रुळावरून घसरून अपघात झाला. या अपघातात 90 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रूकलिन शहरात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जाणारी एलआयआरआर रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेत 90 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याचे समजते. याचबरोबर जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियात या रेल्वे अपघाताचे फोटो व्हायरल झाले असून, यामध्ये रेल्वेचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.