शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेससारखा अपघात, दोन ट्रेनमध्ये धडक, १३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 18:49 IST

Railway Accident in Bangladesh: बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेनमधील भीषण टक्करीमुळे झालेल्या या अपघातामध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत.

बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वेअपघात झाला आहे. दोन ट्रेनमधील भीषण टक्करीमुळे झालेल्या या अपघातामध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकापासून सुमारे ८० किमी अंतरावर एक पॅसेंजर ट्रेन मालगाडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

स्थानिक पोलीस अधिकारी सिराजूल इस्लाम यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी मृतांचा आकडा २० च्या वर गेल्याचा दावा केला आहे. 

वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, भीषण रेल्वे अपघातानंतर अग्निशमन सेवा कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. तसेच बचाव अभियान सुरू आहे.  भैरब रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद आलिम हुसेन शिकदर यांनी सांगितले की, ढाका येथे जाणारी पॅसेंजर ट्रेन ईगारोसिंदूर एक्स्प्रेस गोधुली आणि किशोरगंज येथे जाणारी मालगाडी यांच्यात आज दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात भैरब रेल्वे स्टेशनच्याजवळ झाला. 

दरम्यान, अशाच प्रकारचा भीषण रेल्वे अपघात यावर्षी जून महिन्यात भारतातील ओदिशामध्ये झाला होता. त्या भीषण अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेBangladeshबांगलादेश