देशाच्या परिवर्तनात एनआयआरचेही योगदान, न्यू यॉर्कमध्ये राहुल गांधी यांचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:11 IST2017-09-23T04:10:50+5:302017-09-23T04:11:00+5:30
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.

देशाच्या परिवर्तनात एनआयआरचेही योगदान, न्यू यॉर्कमध्ये राहुल गांधी यांचे वक्तव्य
न्यू यॉर्क : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.
न्यू यॉर्कमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल म्हणाले की, या थोर नेत्यांपैकी प्रत्येक जण जगात फिरले होते. त्यांनी जगाचा अनुभव घेतला होता. परदेशांतून त्यांना जे शिक्षण मिळाले, त्यातील कल्पनांतून त्यांनी भारतात परिवर्तन घडवले, हे विसरून चालणार नाही.
श्वेत क्रांतीचे (दूध क्रांती) प्रणेते वर्गिस कुरीयन हेही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातील सर्वांत मोठे यश म्हणून ओळखले जाते ती दुग्धक्रांती त्यांनीच घडवली, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही, असा होत नाही.
एनआरआय देशाच्या पाठीचा कणा आहेत. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. (वृत्तसंस्था)
>भाजपाचा उल्लेख न करता
राहुल म्हणाले, सगळीकडे लोक मला हल्ली विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा, आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? पण भारतामध्ये दुहीचे राजकारण सुरू झाले, ही वस्तुस्थितीच आहे.