शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi America:'हॅलो मिस्टर मोदी...', राहुल गांधींनी काढला फोन अन् पुन्हा एकदा लावला 'फोन टॅपिंग'चा आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:44 IST

Rahul Gandhi America: राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांनी भाजपवर फोन टॅपिंगचा आरोप लावला आहे.

Rahul Gandhi America: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी सिलिकॉन व्हॅलीस्थित स्टार्टअप उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारवर निशाणा साधला. पेगासस आणि अशा इतर तंत्रज्ञानाच्या मुद्द्याबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'मला माहितीये माझा फोन टॅप केला जातोय. पण, मला त्याचा त्रास नाहीये.' यावेळी राहुल यांनी त्यांचा फोन काढला आणि गमतीने, ''हॅलो! मिस्टर मोदी" असे म्हटले.

मला माहितीये की, माझा फोन टॅप होतोय: राहुलराहुल गांधी यावेळी पेगासस स्पायवेअर आणि तशाप्रकारच्या तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावर चर्चा करत होते. यावेळी राहुलने यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांना म्हणाले की, आता अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची मला अजिबात चिंता नाही. माझा फोन टॅप होतोय, हे मला चांगलंच माहीतीये.  एखाद्या देशाने तुमचा फोन टॅप करायचे ठरवले असेल, तर त्याला तसे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. देशाला फोन टॅपिंगची इच्छा असेल तर अशी लढाई लढण्यात काही अर्थ नाही. मी जे काही करतोय, त्या प्रत्येक गोष्टीची सरकारला माहिती आहे, असंही राहुल म्हणाले.

डेटा म्हणजे सोनं – राहुलराहुल सनीवेलमधील 'प्लग अँड प्ले टेक सेंटर'मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदाही उपस्थित होते. भारतातील दुर्गम खेड्यातील लोकांशी तंत्रज्ञान जोडणे आणि त्याचे परिणाम यावरही राहुल बोलले. राहुल म्हणाले, डेटा हे एक प्रकारचं सोनं आहे आणि भारतासारख्या देशांनी त्याची क्षमता ओळखली आहे. डेटा सुरक्षेबाबत योग्य नियमांची गरज आहे, असंही राहुल म्हणाले. 

राहुल गांधींचा अमेरिका दौरा

राहुल गांधी मंगळवारी अमेरिकेत पोहोचले. येथे त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय समुदायातील लोकांना संबोधित केले. राहुल यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. राहुल वॉशिंग्टन डीसीमध्ये खासदार आणि थिंक टँकच्या बैठका घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा शेवट 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील जाहीर सभेने होणार आहे. हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिकाcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी