शत्रूला भरणार धडकी;भारताचे पारडे क्षेपणास्त्रधारी राफेलमुळे जड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:26 AM2019-10-07T04:26:20+5:302019-10-07T04:26:35+5:30

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: हे विमान घेण्यासाठी पॅरिसला जाणार आहेत.

Rafale with ‘Meteor’ and ‘Scalp’ missiles will give India superior air dominance | शत्रूला भरणार धडकी;भारताचे पारडे क्षेपणास्त्रधारी राफेलमुळे जड

शत्रूला भरणार धडकी;भारताचे पारडे क्षेपणास्त्रधारी राफेलमुळे जड

googlenewsNext

पॅरिस : फ्रान्सकडून घेतल्या जाणारी ‘राफेल’ लढाऊ विमाने ‘मिटिआॅर’ आणि ‘स्कॅल्प’ या त्यांच्या श्रेणीतील जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार असल्याने भारतीय हवाई दलाची शत्रूला धडकी भरेल.
फ्रान्सच्या दस्साँ अ‍ॅव्हिएशन या कंपनीकडून ३६ राफेल विमाने ५९ हजार रुपये खर्च करून खरेदी करण्याचा करार भारताने केल्यानंतर तीन वर्षांनी यातील पहिले विमान येत्या मंगळवारी भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: हे विमान घेण्यासाठी पॅरिसला जाणार आहेत. ‘राफेल’ विमानांवर बसविण्यात येणारी ‘मिटिआॅर’ व ‘स्कॅल्प’ या क्षेपणास्त्रांचे उत्पादन ‘एमबीडीए’ ही युरोपीय कंपनी करते. कंपनीची ही क्षेपणास्त्रे सध्या ब्रिटन, जमर्नी, इटली, फ्रान्स, स्पेन व स्वीडन या देशांच्या हवाईदलांमध्ये वापरली जात असून ती त्या श्रेणीतील जगातील सर्वोत्तम मानली जातात. आखाती युद्धातही ती परिणामकराकपणे वापरली गेली होती. (वृत्तसंस्था)

क्षेपणास्त्रांची बलस्थाने
‘मिटिआॅर’ हे नजरेच्या टप्प्यापलीकडील लक्ष्याचा अचूक वेध घेणारे तर ‘स्कॅल्प’ हे त्याहूनही दूरवर मारा करू शकणारे क्षेपणास्त्र असेल. ‘मिटिआॅर’ क्षेपणास्त्र शत्रूचे रडार स्वत: शोधून काढून त्याला चकवा देऊ शकेल. सर्व प्रकारच्या वातावरणात सारख्याच क्षमतेने काम करणारे हे क्षेपणास्त्र अत्यंत वेगाने जाणाऱ्या विमानांपासून अगदी लहान मानवरहित हवाई वाहनांपर्यंत आणि पलीकडून सोडल्या गेलेल्या क्रूझ क्षेपणास्त्राचीही वेध घेऊ शकते. ‘स्कॅल्प’ हे प्रामुख्याने हवेतून मारा करण्यासाठी वापरायचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा पल्ला ‘मिटिआॅर’पेक्षा खूप जास्त असून शत्रूची जमिनीवरील ठिकाणे व मोक्याची लष्करी आस्थापने उद््ध्वस्त करण्यासाठी ती हुकमी एक्का ठरू शकतील.

Web Title: Rafale with ‘Meteor’ and ‘Scalp’ missiles will give India superior air dominance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.