शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

लंडनमधील उच्चायुक्तालयाबाहेर भारतसमर्थक व विरोधक यांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:37 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात जोरदार चकमक झडली. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडविण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली.

लंडन : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात जोरदार चकमक झडली. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडविण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली.मात्र, संयुक्त राष्टÑांत भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संयुक्त राष्टÑांच्या पाच कायम सदस्यांपैकी रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन यांचे राजदूत कार्यक्रमाला उपस्थित होते. पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी समारंभाला उपस्थित राहून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वॉशिंटन येथील भारतीय दूतावासात अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेजसिंग सरना यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.दर प्रजासत्ताक दिनी भारतविरोधी गट लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर दरवर्षी निदर्शने करतो. हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. ब्रिटिश संसदेचा असंलग्न सदस्य लॉर्ड नजीर अहमद याने यंदाही असेच आंदोलन आयोजित केले होते. त्यावेळी भारतीय ध्वजाची विटंबणा करण्यात आली.दुसºया दिवशी नजीरने पुन्हा आगळीक केली. ‘काश्मीर मुक्त करा’, ‘खलिस्तान मुक्त करा’, ‘नागालँड मुक्त करा’ आणि ‘मणिपूर मुक्त करा’ अशा घोषणा असलेल्या पाच व्हॅन घेऊन तो उच्चायुक्तालयासमोर आला. भारतसमर्थकांशी त्यांची चकमक झाली. भारतविरोधकांनी ‘खलिस्तान आझादी’ आणि ‘आरएसएस दहशतवादी’ अशा घोषणा दिल्या. समर्थकांनी ‘वंदेमातरम्’ व ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या.नरेंद्र मोदी यांच्या लंडनभेटीच्या वेळी २0१६ मध्ये पंतप्रधान असाच संघर्ष झडला होता. ‘फ्रेंडस् आॅफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल’चे संचालक जयू शाह यांनी सांगितले की, आम्ही भारतीय लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आहोत. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. (वृत्तसंस्था)आधीच झाली हकालपट्टी'लॉर्ड अहमदच्या आंदोलनाबाबत भारत सरकारने ब्रिटनकडे आधीच चिंता व्यक्त केली आहे. सरकारी मालमत्तांचा भारतविरोधी प्रचारासाठी वापर करू दिला जाणार नसल्याचे आश्वासन ब्रिटिश सरकारने दिले होते. तथापि, खाजगी मालमत्तांच्या बाबतीत असे आश्वासन दिलेले नाही. पाकव्याप्त काश्मिरात जन्मलेला लॉर्ड अहमद इंग्लंडमध्येच वाढलेला आहे. तो लेबर पार्टीचा सदस्य होता. त्याला २0१२ मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानLondonलंडनJammu Kashmirजम्मू-काश्मीर