शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

१९७६ पासून राणी एलिझाबेथ वापरत होत्या ई-मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 06:44 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा आवर्जून उपयोग

लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या कारभारात वापर करण्याची आवड होती. जगाला ज्यावेळी ई-मेलबद्दल फारसे माहीत नव्हते, त्या काळात १९७६मध्ये एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या माल्व्हर्न येथे रडार उभारणीबाबत त्यांचा पहिला ई-मेल पाठविला होता.त्यांच्या तंत्रज्ञान प्रेमाबद्दलच्या अनेक आठवणी ब्रिटन व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. राणी एलिझाबेथ या स्वत: संगणकावर बसून कधीही ई-मेल लिहित नसत. त्या ई-मेलचा मजकूर सहायकाला तोंडी सांगत असत. राणी एलिझाबेथ यांना १९७६ साली त्यांचे ई-मेल अकाऊंट उघडण्यासाठी ब्रिटनमधील संगणकतज्ज्ञ पीटर किर्सेटिन यांनी मदत केली होती.  त्यांच्यामुळेच राणी एलिझाबेथ इंटरनेटचाही वापर करू लागल्या. त्यासाठी त्यांनी एचएमई २ असे नाव वापरले होते. एचएमई २चे पूर्ण रूप हर मॅजेस्टी एलिझाबेथ २ असे आहे. 

ट्विटर, इन्स्टाग्रामवरही होते अकाऊंट राणी एलिझाबेथ यांचे तंत्रज्ञानप्रेम केवळ ई-मेल पाठविण्यापुरते मर्यादित नव्हते. १९९७ साली राणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या राजघराण्याच्या वेबसाईटचे उदघाटन केले होते. ब्रिटनच्या राजघराण्याचा यूट्यूब चॅनेल डिसेंबर २००७मध्ये सुरू झाला. त्याचे आता ९ लाख ७३ हजार सबस्क्राईबर आहेत. राणी एलिझाबेथ यांचे ट्विटर व इन्स्टाग्रामवरही अकाऊंट होते.

टॅग्स :googleगुगलLondonलंडन