कराचीमध्ये कव्वाली गायक अमजद साबरींची गोळी घालून हत्या
By Admin | Updated: June 22, 2016 17:30 IST2016-06-22T17:28:37+5:302016-06-22T17:30:50+5:30
पाकिस्तानमधील प्रसिद्ध कव्वाली गायक साबरी बंधूपैकी एक अमजद साबरीपी यांची बुधवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

कराचीमध्ये कव्वाली गायक अमजद साबरींची गोळी घालून हत्या
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. २२ - पाकिस्तानमधील प्रसिद्ध कव्वाली गायक साबरी बंधूपैकी एक अमजद साबरीपी यांची बुधवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमजद साबरी हे दिवंगत गायक गुलाम फारीद साबरी यांचे पुत्र होते. बुधवारी दुपारच्या सुमारास मोटर सायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीनी कारमध्ये बसलेल्या साबरी यांच्या वर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात साबरी गंभीर जखमी झाले व रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
साबरी बंधू हे पाश्चिमात्य देशांमध्ये कव्वालीची गोडी लावणा-या प्रमुख कव्वाली गायकांपैकी एक होते.