शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 07:56 IST

हा नरसंहार थांबवून तिसरे महायुद्ध आपण टाळलेच पाहिजे, असेही अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन : ‘आपण यापूर्वी कधीही नव्हतो इतक्या तिसऱ्या जागतिक आण्विक महायुद्धाच्या तोंडावर आहोत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे झेलेन्स्की यांनी माझी भेट घ्यावी आणि या भयंकर युद्धावर तोडगा काढावा’, असे आवाहन अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांना केले आहे. हा नरसंहार थांबवून तिसरे महायुद्ध आपण टाळलेच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले, ‘या युद्धावर तोडगा काढण्यासाठी मी दोघांशीही चर्चा करेन. बायडेन यांनी युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा रशियाविरुद्ध वापर करण्याची परवानगी दिली तर तिसरे आण्विक महायुद्ध सुरू होईल. बायडेन याबाबत अकार्यक्षम आहेत म्हणून हा नरसंहार मलाच थांबवावा लागेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

ज्युनिअर ट्रम्प म्हणतात, यंदा प्रशासन जागरूक 

डोनाल्ड ट्रम्प यांचे चिरंजीव ज्युनिअर ट्रम्प यांनी प्रशासनातील बदलांवर भाष्य केले आहे. हे बदल करणारे लोक याबाबत जागरूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ कसे निवडायचे आणि प्रशासन भक्कम कसे करायचे, हे या लोकांना चांगले ज्ञात असल्याचे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांचा इम्रान यांच्याशी संबंध नाही : साजिद तरार

- अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी काहीही संबंध नाही, असे मूळ पाकिस्तानी वंशाचे अमेरिकी उद्योगपती साजिद तरार यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील ‘मुस्लिम फॉर ट्रम्प’ संघटनेचे साजिद प्रमुख आहेत. ट्रम्प आगामी काळात भारताशी असलेले संबंध अधिक वृद्धिंगत करतील, असे त्यांनी नमूद केले. ब्रेंडन कार प्रसारण आयोगाचे अध्यक्ष

- अमेरिकेच्या प्रसारण-दूरसंचार आणि ब्रॉडबँड आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रेंडन कार यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यापूर्वी कार यांनी आयोगाचे वकील म्हणून काम केले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिका