शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 07:40 IST

Russia-Ukraine News : ट्रम्प यांचे दूत विटकॉफ यांनी पुतिन यांच्याशी भेट घेतली, ज्यामुळे शांततेची काही आशा निर्माण झाली होती. पण..

रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक लांबत चाललं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दूत विटकॉफ यांनी पुतिन यांच्याशी भेट घेतली, ज्यामुळे शांततेची काही आशा निर्माण झाली होती. परंतु, आता युक्रेन युद्धाचे पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रशियाने युद्धविराम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. क्रेमलिनने जाहीर केलं आहे की, 'देशहितासाठी जे योग्य असेल तेच केलं जाईल.' रशियाच्या या भूमिकेमागे चीनचा पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे.

अमेरिका युद्धविरामासाठी प्रयत्नशील, पण रशियाची तयारी वेगळी!अमेरिकेने मुत्सद्देगिरी आणि लष्करी सामर्थ्य या दोन्हींचा वापर करून पुतिन यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांना रशियासोबत थेट युद्ध करायचं नाही, हे स्पष्ट आहे. म्हणूनच स्टीव्ह विटकॉफ मॉस्कोला पोहोचले होते. त्याचबरोबर ट्रम्प यांनी आपला आणखी एक जवळचा नेता पुतिन यांना समजावण्यासाठी कामाला लावला आहे.

याचदरम्यान, अमेरिकेची नौसेना अलास्काच्या चुक्ची समुद्रात युद्धाभ्यास करत आहे. हे ठिकाण रशिया आणि अमेरिका यांच्यातील सर्वात जवळचं आहे. अमेरिका, यूके आणि डेन्मार्क एकत्र येऊन हा युद्धाभ्यास करत आहेत. अमेरिकेची ही चाल रशियावर दबाव टाकण्यासाठी आहे.

नेतन्याहूंची मध्यस्थी, पण पुतिन शांततेच्या मूडमध्ये नाहीत!इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे देखील रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या सात दिवसांत त्यांनी पुतिन यांना दोन वेळा फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटं चर्चा झाली. नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की ते रशिया-अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि युद्धविरामावर सकारात्मक चर्चा झाली आहे. पण जगातील वृत्तसंस्थांच्या मते, पुतिन यांच्या भूमिकेवरून हे स्पष्ट आहे की, युद्धविराम होण्याची शक्यता नाही.

रशियाने अण्वस्त्र करारातून घेतली माघार क्रेमलिनने सांगितलं आहे की, आता अण्वस्त्र क्षेपणास्त्रे तैनात करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. रशियाला हवी तेवढी अण्वस्त्र क्षेपणास्त्रे तैनात करू शकतो. हा करार १९८७ मध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यात झाला होता, ज्यात ५००-५५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीवर मर्यादा होती. आता रशिया या करारातून बाहेर पडला आहे.

चीनही रशियाच्या बाजूने युद्धासाठी सज्जअमेरिकेच्या विरोधात युद्धाचा मोर्चा तयार झाला आहे, यात रशियाचा खास मित्र चीनही सामील आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेने रशियाला घेरलं आहे, त्याचप्रमाणे रशिया आणि चीनने एकत्र येऊन अमेरिकेचा मित्र देश असलेल्या जपानला घेरलं आहे. रशिया आणि चीनची सेना जपानजवळच्या पूर्व समुद्रात संयुक्त युद्धाभ्यास करत आहेत. जर चर्चा यशस्वी झाली नाही, जर रशियाच्या तेलाची निर्यात करणाऱ्या जहाजांवर हल्ले झाले किंवा रशियाच्या हिताला धक्का लागला, तर कधीही महायुद्ध सुरू होऊ शकतं.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाchinaचीन