शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Putin Health Status: नव्या व्हिडिओमध्ये अस्वस्थ दिसले राष्ट्रपती पुतिन, गंभीर आजाराच्या बातम्या येत असतानाच Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 20:20 IST

राष्ट्रपती पुतीन क्रेमलिन येथे एका पुरस्कार समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते काहीसे अस्वस्थ दिसून आले.

Putin Health Status: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा एक नवा व्हिडिओ जबरदस्त वाहायरल होत आहे. या व्हिडिओने त्यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता निर्माण केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पुतिन ब्लड कॅन्सरचा (Blood Cancer) सामना करत आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या एका वृत्तानुसार, राष्ट्रपती पुतीन क्रेमलिन येथे एका पुरस्कार समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते काहीसे अस्वस्थ दिसून आले. ते उभे राहण्यासाठी संघर्ष करत होते. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल -सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे पोडियम जवळ उभे राहून भाषण देत आहेत आणि यावेळी त्यांचे पाय हालत आहेत. सोशल मीडियावरील या पोस्टनुसार, हे एक भयंकर दृष्य आहे. महत्वाचे म्हणजे, पुतिन यांना त्यांच्या डॉक्टरांनी अस्थिर प्रकृतीमुळे अधिक वेळ सार्वजनिक कार्यक्रमांत भाग न घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तरीही पुतिन सार्वजनिक कार्यक्रमात दुसून येतात.

खरे तर, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची प्रकृती जगासाठी नेहमीच चर्चेचा विषय असते. तसेच जेव्हापासून युक्रेन युद्ध सुरू झाले आहे, तेव्हापासून तर ते गंभीर आजारी असल्याच्या अफवाही पसरत आहेत.

पुतिन यांच्यासंदर्भात करण्यात आला आहे असा दावा -फॉक्स न्यूजने मंगळवारी दिलेल्या एका वृत्तानुसार, पुतीन यांचा एक विशेष सहकारी, पुतिन परराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांचे मल-मूत्र एकत्र करतो आणि ते नष्ट करण्यासाठी मास्कोला आणतो. असे करण्या मागे, पुतिन यांच्या प्रकृतीसंदर्भातील  अधिक माहिती समोर येऊ नये, हा उद्देश आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया