हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 05:24 IST2017-01-21T05:24:22+5:302017-01-21T05:24:22+5:30

हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’चा व्यायाम केलेला तुम्ही कधी ऐकला आहे का?

'Push Up' | हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’

हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’


बँकॉक : हत्तीच्या अंगावर ‘पुश अप’चा व्यायाम केलेला तुम्ही कधी ऐकला आहे का? नाही ना. मग, आता ऐका आणि पाहा. जेरी रोमिनी हे पर्यटक सध्या थायलँडमध्ये आले असून, हे चक्क हत्तीच्या अंगावरच ‘पुश अप’चा व्यायाम करीत आहेत. तणावाबाबत जागरूकता करण्यासाठी आपण ही धडपड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. २२ दिवस आपण येथे याबाबत जागरूकता करणार असल्याचे ते सांगतात. विशेष म्हणजे हत्तीच्या अंगावर व्यायाम करीत असताना हा हत्तीही अतिशय शांतपणे उभा असतो. जणूकाही तोही यांच्या मोहिमेत सहभागी झालेला आहे. एका वेळी जेरी रोमिनी २२ ‘पुश अप’ करतात. पर्यटनाच्या ठिकाणी हे सध्या औत्सुक्याचा विषय ठरले आहेत.

Web Title: 'Push Up'