चीनच्या ईशान्येकडे असलेल्या हेलाँगजियांग या प्रांतात कार गेली झाडांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:17 AM2017-10-22T01:17:23+5:302017-10-22T01:18:26+5:30

आपण अनेक प्रकारचे अपघात पाहतो. कधी त्यांच्याविषयी ऐकतो, कधी कोणी स्वत:चा अनुभव सांगतो. पण हा अपघात वेगळाच आहे.

In the province of Heilongjiang, in the northeast of China, cars are used to plant trees | चीनच्या ईशान्येकडे असलेल्या हेलाँगजियांग या प्रांतात कार गेली झाडांवर

चीनच्या ईशान्येकडे असलेल्या हेलाँगजियांग या प्रांतात कार गेली झाडांवर

Next


आपण अनेक प्रकारचे अपघात पाहतो. कधी त्यांच्याविषयी ऐकतो, कधी कोणी स्वत:चा अनुभव सांगतो. पण हा अपघात वेगळाच आहे. इथे कार उडून चक्क झाडांत जाऊ न अडकल्याचं पाहायला मिळालं. चीनच्या ईशान्येकडे असलेल्या हेलाँगजियांग या प्रांतातील. या प्रांताच्या महामार्गावरून ही कार प्रचंड वेगाने जात होती. पुढे अचानक रस्ता बंद असा फलक चालकाला दिसला. तो पाहताच त्याने कारचे ब्रेक दाबले आणि ही कार उडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलातील दोन झाडांच्या मध्ये जाऊ न अडकली. काही वेळाने मदतकार्य करणारे लोक तिथे पोहाचले. त्यांनी ती कार सावकाश खाली आणली. गंमत म्हणजे कारच्या आतमध्ये असलेले पाचही जण या अपघातातून सुखरूप वाचले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. कारचं मात्र बरंच नुकसान झालं या अपघातात.

Web Title: In the province of Heilongjiang, in the northeast of China, cars are used to plant trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार