नियमित सेक्समुळे वाढते प्रमोशनची शक्यता - स्टडी रिपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 16:36 IST2017-03-09T16:28:40+5:302017-03-09T16:36:09+5:30

नोकरी करणा-या प्रत्येकाला प्रमोशनची अपेक्षा असते. प्रमोशन देताना कंपनीच्या नफ्यामध्ये तुमचे योगदान, ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबून काम करणे, बॉसशी चांगले संबंध या गोष्टी विचारात घेतल्या जातात.

Promotions of Increasing Promotion by Regular Sex - Study Reports | नियमित सेक्समुळे वाढते प्रमोशनची शक्यता - स्टडी रिपोर्ट

नियमित सेक्समुळे वाढते प्रमोशनची शक्यता - स्टडी रिपोर्ट

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 9 - नोकरी करणा-या प्रत्येकाला प्रमोशनची अपेक्षा असते. प्रमोशन देताना कंपनीच्या नफ्यामध्ये तुमचे योगदान, ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबून काम करणे, बॉसशी चांगले संबंध या गोष्टी विचारात घेतल्या जातात. पण आता एका संशोधनातून प्रमोशनचा संबंध सेक्सशी असल्याचे समोर आले आहे. 
 
जे लोक नियमित सेक्सचा आनंद घेतात ते नोकरीच्या ठिकाणी जास्त आनंदी, समाधानी असतात. आपल्या कामावर जास्त मेहनत घेऊन यशाची शिडी चढत जातात असे निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. सेक्स लाईफ उत्तम असेल तर, कर्मचारी जास्त आनंदी राहतात आणि कामात जास्त लक्ष देतात. ज्याचा कर्मचारी आणि कंपनी दोघांना फायदा होतो असे ओरीगॉन स्टेट विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे. 
 
सेक्समुळे शरीरात काही रसायने तयार होतात. ज्याचा मूडवर परिणाम होतो. शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार झाल्यामुळे कर्मचारी अधिक उत्साहाने काम करतात असे ओरीगॉनच्या संशोधकांचे म्हणणे आहे. सेक्सचा कामावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी 159 विवाहीत कर्मचा-यांचा दोन आठवडे अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला. 
 

Web Title: Promotions of Increasing Promotion by Regular Sex - Study Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.