प्रेयसीच्या 'लव्ह बाईट'मुळे प्रियकराचा मृत्यू

By Admin | Updated: September 2, 2016 08:58 IST2016-09-02T08:58:15+5:302016-09-02T08:58:15+5:30

प्रेमात असलेल्या प्रियकर-प्रेयसीने परस्परांचे चुंबन घेणे सामान्य बाब आहे. चुंबनातून प्रेमाची भावना व्यक्त करतात.

Priyaksha's death by 'love-byte' | प्रेयसीच्या 'लव्ह बाईट'मुळे प्रियकराचा मृत्यू

प्रेयसीच्या 'लव्ह बाईट'मुळे प्रियकराचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

लीऑन, दि. २ - प्रेमात असलेल्या प्रियकर-प्रेयसीने परस्परांचे चुंबन घेणे सामान्य बाब आहे. चुंबनातून प्रेमाची भावना व्यक्त करताना ते चुंबन आपल्या जीवलगाच्या जीवावर बेतेल असा विचारही कोणाच्या मनाला शिवत नाही. पण मेक्सिकोमधील एका शहरात प्रेयसीचे चुंबन प्रियकराच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. 
 
मेक्सिकोमध्ये रहाणा-या १७ वर्षाच्या ज्युलियो मासीयस गोनझालेझचे त्याच्या प्रेयसीने चुंबन घेतले. प्रेयसीने ज्युलियोच्या मानेचे चुंबन घेतले. पण या चुंबनामुळे ज्युलियोच्या मानेपासून डोक्यापर्यंत रक्ताच्या गुठळया तयार झाल्या. 
 
ज्युलियो प्रेयसीला भेटून आल्यानंतर कुटुंबियांसोबत जेवण घेत असताना अचानक आकडी येऊन खाली कोसळला. कुटुंबिय त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्युलियोच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूसाठी प्रेयसीला जबाबदार धरले आहे. तिच्या चुंबनामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला असे त्यांचे म्हणणे आहे. 
 

Web Title: Priyaksha's death by 'love-byte'