प्रिन्स विल्यम व केट यांना कन्यारत्नाची प्राप्ती
By Admin | Updated: May 2, 2015 19:05 IST2015-05-02T16:38:12+5:302015-05-02T19:05:19+5:30
प्रिन्स विल्यम व 'डचेस ऑफ केम्ब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

प्रिन्स विल्यम व केट यांना कन्यारत्नाची प्राप्ती
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २ - प्रिन्स विल्यम व 'डचेस ऑफ केंब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याने ब्रिटीश राजघराण्यात आनंदाचे वातावरण आहे. पॅडिंग्टन येथील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये केट यांनी स्थानिक वेळेनुसार ८ वाजून ३४ मिनिटांनी गोंडस मुलीला जन्म दिला. किंगस्टन पॅलेसतर्फे ही घोषणा करण्यात आली असून केट मिडलटन व मुलीची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान राजघराण्यातील नव्या पाहुणीच्या जन्मावेळी ड्यूक ऑफ केंब्रिज प्रिन्स विल्यमही उपस्थित होते.
केट मिडलटन यांना लिंडो विंगच्या त्याच सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे जुलै २०१३ मध्ये प्रिन्स जॉर्जचा जन्म झाला होता. मुलीचे नाव अद्याप निश्चित करण्यात आले नसले तरी थोड्याच दिवसांत तिचे नामकरण होईल असेही पॅलेसतर्फे सांगण्यात आले आहे.