हे राजकुमार जुगारात पाचही पत्नींना हरून बसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 04:54 IST2017-06-06T04:54:13+5:302017-06-06T04:54:13+5:30

सौदी अरेबियाचे राजकुमार माजीद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल अजीज पुन्हा चर्चेत आहेत

This prince lost his wife to Jugar | हे राजकुमार जुगारात पाचही पत्नींना हरून बसले

हे राजकुमार जुगारात पाचही पत्नींना हरून बसले

रियाध : सौदी अरेबियाचे राजकुमार माजीद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल अजीज पुन्हा चर्चेत आहेत. निमित्त आहे जुगारात हरण्याचे. सिनई ग्रँडमध्ये त्यांनी पोकर खेळायला सुरुवात केली आणि सहा तासांत ते ३५० मिलियन अमेरिकी डॉलर हरले. त्यानंतरही ते खेळायचे थांबले नाहीत. २५ मिलियन डॉलरच्या बदल्यात ते आपल्या पाचही पत्नींना हरून बसले. कॅसिनोचे संचालक अली शमून यांनी ही माहिती दिली. जुगारात हरल्यानंतर ते पाचही पत्नींना सोबत न घेता येथून निघून गेले. या कॅसिनोत लोक उंट, घोडे यांना गहाण ठेवतात; पण असे प्रथमच झाले की, एखादा व्यक्ती आपल्या पत्नीला हरल्यानंतर येथेच सोडून गेला. असे सांगितले जात आहे की, सौदीची रॉयल फॅमिली पैसे देऊन या महिलांची सुटका करेल.

Web Title: This prince lost his wife to Jugar