शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 13:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले.

काठमांडू- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मुक्तीनात मंदिराजवळ सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले.उद्या शनिवारी ते मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार असल्याने भारतीय सुरक्षारक्षकांनीही या परिसराला भेट देऊन व्यवस्थेची पाहाणी केली. याबाबत बोलताना मुख्य जिल्हा अधिकारी शिशिर राज पौडेल म्हणाले, सर्व जिल्ह्यामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून जिल्ह्याच्या सर्व 15 चेकपॉइंट्सवर सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आलेली आहे. शुक्रवारी दुपारी 4 वाजल्यापासून शनिवारी दुपारपर्यंत मुक्तीनाथ मंदिरात भाविकांना देवदर्शन थांबविण्याचा निर्णय जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुक्तीनाथ मंदिराच्या भेटीची सुरक्षा व्यवस्था नेपाळ पोलीस. नेपाळ पोलीस दल, नेपाळी लष्कराने स्वीकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या शिष्टमंडळासह मुक्तीनाथ मंदिरात येणार असल्यामुळे मंदिराजवळच 5 हेलिपॅड्स तयार करण्यात आले आहेत. या मंदिरात पंतप्रधानांच्या भेटीमुळे विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले आहे.

आता दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतील. या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे. 

टॅग्स :NepalनेपाळNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतprime ministerपंतप्रधानKathmanduकाठमांडूJanakpurजनकपूर