शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडोनेशियात उडवला पतंग, दिली मशिदीला भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 14:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौ-यावर आहेत. नरेंद्र मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांच्याशी जकार्तामधील मर्डेका पॅलेसमध्ये चर्चा केली. तसेच, भारत आणि इंडोनेशियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचांसोबतच्या संयुक्त संवादासाठी ते उपस्थित होते.

जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौ-यावर आहेत. नरेंद्र मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांच्याशी जकार्तामधील मर्डेका पॅलेसमध्ये चर्चा केली. तसेच, भारत आणि इंडोनेशियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचांसोबतच्या संयुक्त संवादासाठी ते उपस्थित होते. यावेळी दहशतवादाच्या मुद्यावर त्यांनी निशाना साधला. दोन्ही देशांत 15 करारांवर सह्या करण्यात आल्या.इंडोनेशियात नरेंद्र मोदी यांनी येथील मशिदीला भेट दिली. याचबरोबर, जकार्तामधील मॉन्यूमेंट सेंटरमध्ये पतंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रामायण आणि महाभारत या थीमवर या प्रदर्शनात पतंग तयार करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्धाटन नरेंद्र मोदी आणि जोको व्हिडोडो यांनी केले. यावेळी त्यांनी पतंग उडवला. दरम्यान, या पतंग प्रदर्शनाचे आयोजन जकार्तामधील लयांग-लयांग म्यूझियम आणि अहमदाबादमधील काईट म्यूझियमतर्फे करण्यात आले होते. 

नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. उद्या सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूर दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी फाइनटेक, कौशल्य विकास, शहरी नियोजन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रात भारत-सिंगापूर भागीदारी अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. सिंगापूरमध्ये भारत-सिंगापूर उद्योग आणि नवोन्मेष प्रदर्शनाला भेट देणार आहे. सिंगापूरच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्यवसाय आणि गुंतवणूक संधींबाबत चर्चा आणि व्यावसायिक आणि समुदायाला संबोधित करणार आहेत.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndonesiaइंडोनेशिया