शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 12:12 IST

भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जनकपूर येथून झाली असून, तेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जनकपूर येथून झाली असून, तेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदींनी जनकपूर येथील  जानकी मंदिरामध्ये विशेष पूजा केली. या भेटीदरम्यान, मोदींनी जनकपूर-अयोध्या या बससेवेला हिरवा झेंडा दाखवत तिचे औपचारिक उदघाटन केले. त्यानंतर ते काठमांडू येथील बैठकांमध्ये सहभागी होतील. दरम्यान, जनकपूर येथे मोदींना पाहण्यासाठी नेपाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तचे मोदींच्या जानकी मंदिर दौऱ्यादरम्यान नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली हेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये काहीशी कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भारत आणि नेपाळ संबंध पुन्हा मधूर बनवण्यावर मोदींचा भर असेल. तसेच नेपाळमध्ये भारताच्या सहकार्याने सुरू असलेल्या योजनांची तात्काळ सुरुवात करण्यावर मोदी जोर देणार आहेत. 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले,  अयोध्या आणि जनकपूरचे पिढ्यान पिढ्यांचे अतूट नाते आहे. येथे  एकादशीच्या दिवशी येथे येता आले हे मी माझे भाग्य  समजतो. आता भारत आणि नेपाळ एकत्र येऊन दोन्ही देशांमध्ये रामायण सर्किट बनवण्याच्या दिशेने काम करतील. तसेच  नेपाळचे पंतप्रधान काठमांडूहून येथे आले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतNepalनेपाळ