शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानचा सर्वोच्च पुरस्कार; सन्मान मिळविणारे मोदी पहिलेच विदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:35 IST

पंतप्रधान तोबगे यांनी मोदींची गळाभेट घेत माझ्या मोठ्या भावाचे स्वागत आहे, असे म्हटले

थिम्पू : भूतानने ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शुक्रवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना सन्मानित केले. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले विदेशी नेते आहेत. यापूर्वी मोदींना १२ हून अधिक देशांनी आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.  मोदी यांनी भारत-भूतान संबंध वृद्धिंगत करण्यात दिलेले योगदान तसेच त्यांनी भूतान  देश व तेथील लोकांच्या केलेल्या अतुलनीय सेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.भूतानचा ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ पुरस्कार मिळाल्यामुळे आपण भारावून गेलो आहोत. मी हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांना समर्पित करतो, असे मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ प्रदान केला. वांगचूक यांनी १७ डिसेंबर २०२१ रोजी ११४ व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात या सर्वोच्च नागरी पुरस्काराची घोषणा केली होती. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी दोन दिवसीय भूतान दौऱ्यादरम्यान हा पुरस्कार स्वीकारला. आतापर्यंत केवळ चार जणांना या  पुरस्काराने सन्माानित करण्यात आले आहे.

  • रेल्वेसेवा सुरू होणार

- उभय देशांदरम्यान रेल्वेसेवा सुरू करण्यासह विविध सामंजस्य करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आल्या. यात ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ आणि कृषी क्षेत्राशी संबंधित करारांचा समावेश आहे. - पंतप्रधान मोदी व त्यांचे भूतानचे समपदस्थ शेरिंग तोबगे यांच्या उपस्थितीत येथे सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. पंतप्रधान मोदी यांनी अभूतपूर्व स्वागताबद्दल पंतप्रधान- तोबगे यांचे आभार मानले, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

माझ्या मोठ्या भावाचे स्वागत

तत्पूर्वी, मोदींचे भूतानमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान तोबगे यांनी मोदींची गळाभेट घेत माझ्या मोठ्या भावाचे स्वागत  आहे, असे म्हटले. भूतानी युवकांनी पारंपरिक भारतीय पोषाख घालून पंतप्रधान मोदींनी रचलेल्या गरबा गीतावर नृत्य सादर करत त्यांचे स्वागत केले. मोदींनी नृत्याच्या सादरीकरणाची प्रशंसा केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBhutanभूतान