शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदींचं स्वागत करा, पण...", अमेरिकेच्या ७५ खासदारांचे बायडेन यांना 'खरमरीत' पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याला बुधवारपासून सुरूवात झाली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) पंतप्रधान अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदींना खास निमंत्रण पाठवले असून त्यांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील आगमनापूर्वी, ७५ अमेरिकन खासदार आणि काँग्रेस प्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना पत्र लिहून भारत-अमेरिका यांचे संबंध मजबूत करण्यासाठी काम करा असे म्हटले. याशिवाय अमेरिकन खासदारांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी दुपारी लिहिलेल्या पत्रात अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट आणि सिव्हिल सोसायटीच्या अहवालांचा हवाला देत, खासदारांनी राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेदरम्यान, भारतातील 'राजकीय स्पेस कमी होणे, धार्मिक असहिष्णुता वाढणे, नागरी समाज संघटना आणि पत्रकारांना लक्ष्य करणे, तसेच माध्यमांवर वाढत असलेले प्रतिबंब' या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. 

"मित्रांनी मोकळ्यापणाने बोलायला हवे"भारत सरकारने आपल्या मानवी हक्कांच्या नोंदीवरील टीका सातत्याने फेटाळून लावली आहे. हे अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित केले असल्याचे भारत सरकारने  वारंवार सांगितले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक, व्यावसायिक आणि संरक्षण संबंध असल्याचे खासदारांनी त्यांच्या पत्रात नमूद केले. त्यांनी लिहले की, भारत आणि अमेरिका हे मित्र आहेत आणि मित्रांनी प्रामाणिकपणे तथा मोकळेपणाने कोणत्याही मुद्द्यावर बोलले पाहिजे.

"भारत आणि अमेरिका यांच्यात असलेले मैत्रीचे संबंध यामुळेच आम्ही तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की, भारत आणि अमेरिका यांच्यातील समान हिताच्या अनेक मुद्द्यांसह थेट पंतप्रधान मोदींशी चिंतेच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करायला हवी", असेही अमेरिकन खासदारांनी लिहलेल्या पत्रात नमूद आहे. 

दरम्यान, हे पत्र लिहणाऱ्या खासदारांचे नेतृत्व सीनेटर क्रीस वॅन होलेन आणि प्रमिला जयपाल यांनी केले आहे. होलेन या भारताच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर सातत्याने टीका करत असतात. त्यांनी अलीकडेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबतच्या डिनरमध्ये सहभाग घेतला होता. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाIndiaभारतMember of parliamentखासदार