पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानमध्ये, नव्या संसद भवनाचे करणार उद्घाटन
By Admin | Updated: December 25, 2015 11:11 IST2015-12-25T11:11:36+5:302015-12-25T11:11:52+5:30
दोन दिवसांचा यशस्वी रशिया दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अफगाणिस्तान दौ-यासाठी राजधानी काबूलमध्ये दाखल झाले आहेत

पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानमध्ये, नव्या संसद भवनाचे करणार उद्घाटन
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २५ - दोन दिवसांचा यशस्वी रशिया दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अफगाणिस्तान दौ-यासाठी राजधानी काबूलमध्ये दाखल झाले आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी त्यांचे स्वागत केले. या एकदिवसीय दौ-या दरम्यान मोदींच्या हस्ते भारताच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या अफागाणिस्तानमधील नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन होणार असून त्यानंतर ते अफगाण संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित करणार आहेत.
'काबूलमध्ये मित्रांसोबत भेट झाल्याने मी आनंदित आहे. राष्ट्रपती अश्रफ गनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुला व माजी राष्ट्रपती हमिद करझई यांची भेट थोड्याच वेळात भेट घेणार' असे ट्विट काबूलमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी केले.