पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम पुरीला संपवले, पाकिस्तानी वाहिनीचा दावा

By Admin | Updated: January 9, 2017 13:45 IST2017-01-09T13:45:29+5:302017-01-09T13:45:29+5:30

ओम पुरी यांच्या अकाली निधनाबद्दल भारतीय सिनेसृष्टीतून हळहळ, दु:ख व्यक्त होत असताना पाकिस्तानातील एका वाहिनीने...

Prime Minister Narendra Modi ended Om Puri, claiming the Pakistani channel | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम पुरीला संपवले, पाकिस्तानी वाहिनीचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम पुरीला संपवले, पाकिस्तानी वाहिनीचा दावा

 ऑनलाइन लोकमत 

कराची, दि. 9 - मागच्या आठवडयात प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओम पुरी यांच्या अकाली निधनाबद्दल भारतीय सिनेसृष्टीतून हळहळ, दु:ख व्यक्त होत असताना पाकिस्तानातील एका वाहिनीने ओम पुरी यांच्या मृत्यूचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर संबंध जोडला आहे. 
 
ओम पुरी यांच्या मृत्यूमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा हात असल्याचा दावा बोल टीव्हीच्या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. ओम पुरी हे पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करायचे म्हणून मोदी आणि डोवाल यांनी कट रचून त्यांची हत्या केली असा अचरट आरोप बोल टीव्हीचा अँकर आमिर लियाकतने केला.  
 
डोवाल यांनी आपल्या निवासस्थानी ओम पुरी यांना बेदम मारहाण केली होती. त्यांना उरी हल्ल्यातील शहीद नितीन यादव यांच्या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास सांगण्यात आले होते असे अचरट आरोप बोल टीव्हीने केला होता.  
 

Web Title: Prime Minister Narendra Modi ended Om Puri, claiming the Pakistani channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.