पंतप्रधान मोदींचे नेपाळमध्ये सेवा परमो:धर्म

By Admin | Updated: November 25, 2014 17:49 IST2014-11-25T17:15:37+5:302014-11-25T17:49:24+5:30

नेपाळच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवारी) ट्रॉमा सेंटरचे उद्घाटन केले. या सेंटरमधील अत्याधुनिक प्रणाली ही भारताकडून नेपाळला भेट देण्यात आली आहे.

Prime Minister Modi's service in Nepal: religion | पंतप्रधान मोदींचे नेपाळमध्ये सेवा परमो:धर्म

पंतप्रधान मोदींचे नेपाळमध्ये सेवा परमो:धर्म

>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २५ - सार्कच्या १८ व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी नेपाळच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवारी) ट्रॉमा सेंटरचे उद्घाटन केले. या सेंटरमधील अत्याधुनिक प्रणाली ही भारताकडून नेपाळला भेट देण्यात आली आहे. तसेच नेपाळच्या मुलभूत गरजांपैकी असणा-या वीज आणि रस्ते याबाबतही पंतप्रधान मोदींचे भाषण नेपाळसाठी आशादायी आहे. उद्घाटनादरम्यान मोदींनी दिल्ली ते काठमांडू बस सेवा सुरु करणार असल्याचे सांगितले. तसेच ही बससेवा वाय-फाय युक्त असणार आहे असेही मोदींनी सांगितले. त्याचप्रमाणे भारत नेपाळला एक मिलियन म्हणजेच दहा हजार कोटी नेपाळी रुपये कमी व्याज दरात देणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे भारतीय बनावटीचे धुव हे हॅलिकॉप्टर नेपाळला समर्पित करत असल्याचेही त्यांनी म्हटले. 
शेत जमिनीत कोणते पिक चांगले येऊ शकते याची माहिती देण्यासाठी सॉइल टेस्ट मोबाईल व्हॅनही भारताकडून नेपाळला भेट देण्यात आली. नेपाळमधून भारतात नोकरी करता येणारे अनेक लोक आहेत त्यांना हजार रुपये व पाचशे रुपयांच्या नोटा आणण्यावर असलेले निर्बंध हटवून ती मर्यादा २५,००० इतकी केली असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. तसेच संपर्क साधणे स्वस्त व्हावे म्हणून भारत ३५ % दर कपात करणार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले असून नेपाळच्या दुरध्वनी विभागाला दर कमी करण्याची विनंती केली आहे. 
 

Web Title: Prime Minister Modi's service in Nepal: religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.