शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी राबवत आहेत स्वतंत्र बाण्याचे परराष्ट्र धोरण, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 07:12 IST

भारताचे व तेथील जनतेचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्र बाण्याचे परराष्ट्र धोरण राबवत आहेत, अशी पुतीन यांनी स्तुती केली.

मॉस्को : रशियाचे भारताशी उत्तम मैत्रीसंबंध आहेत. विविध प्रसंगांमध्ये दोन्ही देशांनी परस्परांना पाठिंबा दिला असून, हे सहकार्य भविष्यातही कायम राहील, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. भारताचे व तेथील जनतेचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्र बाण्याचे परराष्ट्र धोरण राबवत आहेत, अशी पुतीन यांनी स्तुती केली.

वाल्दाई इंटरनॅशनल डिक्सशन क्लबने आयोजिलेल्या एका कार्यक्रमात पुतीन यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारत व रशियामध्ये गेल्या काही दशकांपासून संरक्षण, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्येही उत्तम सहकार्य प्रस्थापित झाले आहे. भारताला जगात सर्वत्र आदराची वागणूक मिळत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कारणीभूत आहे.

सध्याचा काळ युद्ध करण्याचा नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांना महिनाभरापूर्वी सांगितले होते. रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्रांची यंत्रणा विकत घेण्याबाबत ऑक्टोबर २०१८ मध्ये करार केला होता. या कराराच्या वेळी अमेरिकेने भारतावर निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता; पण भारताने त्याकडे लक्ष दिले नव्हते. (वृत्तसंस्था)

‘मोदी आहेत सच्चे देशभक्त’राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे देशभक्त आहेत. त्यांनी देशाचा विकास करण्यासाठी मेक इन इंडिया ही मोहीम हाती घेतली. त्यामुळे भारताची मोठी प्रगती होणार आहे. भारत हा केवळ जगातील सर्वात मोठा लोकशाही देशच नाही तर त्या देशाचा विकास दरही अभिमानास्पद आहे.

रशियन लष्करावर युक्रेनचे  हल्लेकीव्ह : रशियाच्या लष्कराने खेरसन शहराच्या काही भागांवर कब्जा केला असून, तिथे युक्रेनच्या सैन्याने जोरदार हल्ले केले. खेरसनच्या काही भागात रशियाने नेमलेले अधिकारी मायदेशात पळून गेल्याचे वृत्त आहे.  युक्रेनमधील डोनबास प्रांतावर संपूर्ण कब्जा करण्याचे रशियाचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. युक्रेन युद्धात अण्वस्त्रे वापरण्याचा रशियाचा इरादा नाही, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. युक्रेनला युद्धामध्ये जैविक अस्त्रे बनविण्यासाठी अमेरिका मदत करत असल्याचा आरोप रशियाने यापूर्वी केला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन