शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
2
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
5
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
6
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
7
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
8
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
9
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
10
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
11
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
12
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
13
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
14
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
15
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
16
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
17
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
18
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
19
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
20
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:20 IST

ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांतील संबंध आजही चांगले असले तरी, रशियन तेलाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे पंतप्रधान मोदी नाराज आहेत. ट्रम्प हाउस जीओपी मेंबर रिट्रीट दरम्यान बोलत होते.

भारत-US संबंधांसंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा  भाष्य केले आहे. दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी, रशियन तेलाच्या खरेदीवरून निर्माण झालेल्या तणावासंदर्भात भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांतील संबंध आजही चांगले असले तरी, रशियन तेलाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे पंतप्रधान मोदी नाराज आहेत. ट्रम्प हाउस जीओपी मेंबर रिट्रीट दरम्यान बोलत होते.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादले आहे. यातील २५ टक्के टॅरीफ रशियन तेलाच्या खरेदीमुळे लादण्यात आले आहे. ट्रम्प म्हणाले, "मोदींना माहिती होते की मी नाराज आहे आणि ते मला खुश करण्याचाही प्रयत्न करत होते." 

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना, भारत तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे रशियाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्षेप आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रम्प स्वतः रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थ म्हणून सादर करत आहेत. यासंदर्भात त्यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली आहे. 

दरम्यान, आपल्या टॅरिफ नीतीचा अमेरिकेला मोठा फायदा होत आहे, तसेच, अमेरिका टॅरीफच्या फायदा आपल्या हितासाठी करत आहे, असेही टम्प म्हणाले. 

दुसऱ्या बाजूला, भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट राहिली आहे. ट्रम्प यांनी, भारताने रशियन तेल खरेदी बंद करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा भारताने आधीच फेटाळून लावला आहे. भारताने, कोणत्याही दबावाखाली तेल आयात बंद करण्याचा शब्द दिलेला नाही, हे स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Claims Modi is Unhappy; Discusses India-US Relations

Web Summary : Trump says Modi is upset about US tariffs on India due to Russian oil purchases. Despite this, he maintains good relations. India denies promising to halt Russian oil imports, asserting its independent policy.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाrussiaरशियाIndiaभारत