टाईम मासिकाकडून भारतीयाचा बहुमान
By Admin | Updated: September 21, 2014 01:28 IST2014-09-21T01:28:53+5:302014-09-21T01:28:53+5:30
झोपडपट्टीत राहणा:या लोकांसाठी पुरापासून संरक्षण देणा:या किफायतशीर घरांचे डिझाईन तयार करणा:या भारतीय वास्तुविशारदाचा टाईम मासिकाने ‘उद्याचा युवा नेता’ असा बहुमान केला आहे.

टाईम मासिकाकडून भारतीयाचा बहुमान
न्यूयॉर्क : झोपडपट्टीत राहणा:या लोकांसाठी पुरापासून संरक्षण देणा:या किफायतशीर घरांचे डिझाईन तयार करणा:या भारतीय वास्तुविशारदाचा टाईम मासिकाने ‘उद्याचा युवा नेता’ असा बहुमान केला आहे.
टाईमने पुढील पिढीतील नेत्यांच्या पहिल्या श्रेणीत 6 प्रेरणादायी युवकांची नावे घेतली असून त्यात अशोक शेट्टी यांचा समावेश आहे. हे युवक त्यांचे जग बदलण्यासाठी आज कठीण परिश्रम करीत असल्याचे ‘टाईम’ने म्हटले आहे. शेट्टी यांनी भारतात आशेचा किरण निर्माण केला आहे, अशा शब्दांत टाईमने शेट्टींचा गौरव केला. शेट्टी हे बंगळुरूतील परिणाम फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करीत आहेत. ही संस्था झोपडपट्टीवासीयांसाठी पुरापासून संरक्षण देणा:या घरांचे डिझाईन बनविण्याचे काम करते. पावसाळ्यात झोपडपट्टीधारकाच्या झोपडीत पुराचे पाणी घुसते आणि ते मलेरियासारख्या आजारांचे पैदास केंद्र बनते. यापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शेट्टी झटत आहेत. (वृत्तसंस्था)