लेबनानमध्ये इस्रायलच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने थेट शस्त्रसंधी करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली. इतकंच नाही, तर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करत अमेरिकेची कोंडी केली. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहवरील हल्ले थांबवणार नाही, असा इशारा दिला आहे.
लेबनानमध्ये इस्रायलच्या लष्कराने बुधवारी (८ एप्रिल) केलेल्या हल्ल्यात तब्बल २०३ लोक मरण पावले, तर १००० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. त्यानंतर खवळलेल्या इराणने अमेरिकेला शस्त्रसंधी करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली. आता यावर इस्रायलच्या पंतप्रधानांनी भाष्य केले आहे.
नेतन्याहू म्हणाले, "पूर्ण ताकदीने हिजबुल्लाहवर हल्ले करू'
लेबनानमधील रहिवाशी इमारतीनाच इस्रायलने लक्ष्य केले. हिजबुल्लाहशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केल्याचे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले. आता पंतप्रधान नेतन्याहू यांनीही अशी भूमिका मांडली आहे.
नेतन्याहू म्हणाले की, "हिजबुल्लाहवर आम्ही पूर्ण शक्तीने, अचूक आणि निर्धाराने हल्ले करणे सुरूच ठेवले आहेत. बेरुतमध्ये आम्ही अली युसूफ खर्शी याला ठार केले आहे, हा हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचा सरचिटणीस नईम कासिम याचा खासगी सचिव आणि त्याच्या अत्यंत जवळच्या माणसांपैकी एक होता", असा दावा नेतन्याहू यांनी केला आहे.
हिजबुल्लाहचे अड्डे आणि शस्त्रास्त्रे उद्ध्वस्त केले
नेतन्याहू म्हणाले की, "काल (८ एप्रिल) रात्री इस्रायलच्या लष्कराने (आयडीएफ) दक्षिण लेबनानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले. यात हजारो शस्त्रास्त्र, रॉकेट्स आणि ते वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे रस्ते, शस्त्रास्त्रांचे साठे, लाँचर्स, हिजबुल्लाहचे मुख्यालय हे उद्ध्वस्त केले."
नेतन्याहू यांनी शेअर केला हल्ल्यांचा व्हिडीओ
"आमची भूमिका स्पष्ट आहे जो कोणीही इस्रायलच्या नागरिकाच्या जिवाला धोका पोहचेल असे कृत्य करेल, त्याच्यावर हल्ला केला जाईल. जोपर्यंत उत्तरेकडील (इस्रायलच्या उत्तरेत राहणारे) नागरिकांची सुरक्षा पूर्णपणे पूर्वस्थितीत आणत नाही, तोपर्यंत आम्ही जिथे गरज पडेल, तिथे हिजबुल्लाहवर हल्ले करत राहू", असा इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे.
शस्त्रसंधीनंतर लेबनानवर हल्ले
हिजबुल्लाह लक्ष्य करत हल्ले केल्याचे दावे इस्रायलकडून केले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे जे हल्ले केले गेले, त्यात अनेक लेबनानी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे अनेक शहरांतून लोकांनी स्थलांतर केले असून, ती संख्या १२ लाख इतकी आहे.
इस्रायलने बुधवारी केलेल्या हल्ल्यांत तब्बल २०३ नागरिक मारले गेले आहेत. इस्रायल संरक्षण दलाने रहिवाशी इमारतींवरच मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले केले. यात अनेक इमारती कोसळल्या आहेत.
Web Summary : Netanyahu vows to continue strikes on Hezbollah after Lebanon attacks killed 203. Iran threatened to withdraw from agreements. Israel targeted Hezbollah sites, including residences, claiming to kill a key commander. Northern Israel security is priority.
Web Summary : लेबनान हमलों में 203 लोगों की मौत के बाद नेतन्याहू ने हिजबुल्लाह पर हमले जारी रखने की कसम खाई। ईरान ने समझौतों से हटने की धमकी दी। इज़राइल ने एक प्रमुख कमांडर को मारने का दावा करते हुए हिजबुल्लाह ठिकानों, आवासों को निशाना बनाया। उत्तरी इज़राइल सुरक्षा प्राथमिकता है।