30 सप्टेंबरपासून पाकिस्तानात प्राथमिक शाळा सुरू होणार, मुलांसाठी विशेष तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 05:16 PM2020-09-29T17:16:54+5:302020-09-29T17:17:11+5:30

पहिल्या टप्प्यात महाविद्यालय, विद्यापीठासह 9 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्या. यानंतर 23 सप्टेंबरपासून 8 वी, 7 वी आणि 6वी इयत्तेच्या शाळा सुरू करण्यात आल्या.

Primary school in Pakistan will start from September 30, special preparation for children | 30 सप्टेंबरपासून पाकिस्तानात प्राथमिक शाळा सुरू होणार, मुलांसाठी विशेष तयारी

30 सप्टेंबरपासून पाकिस्तानात प्राथमिक शाळा सुरू होणार, मुलांसाठी विशेष तयारी

Next

पाकिस्तानमध्ये मोठ्या शाळा व महाविद्यालय सुरू झाल्याच्या 15 दिवसांनंतर 30 सप्टेंबरपासून लहान मुलांसाठीच्या प्राथमिक शाळा सुरू केल्या जात आहेत. प्राथमिक शाळांसाठी नियम कडक करण्यासाठी पाकिस्तान सरकारने कठोर पावले उचलली आहेत. प्राथमिक शाळांमधील मुलांसाठी ही विशेष अंमलबजावणी केली जाईल. पाकिस्तानने देशातील शैक्षणिक संस्था तीन टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाविद्यालय, विद्यापीठासह 9 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्या. यानंतर 23 सप्टेंबरपासून 8 वी, 7 वी आणि 6वी इयत्तेच्या शाळा सुरू करण्यात आल्या. यानंतर 30 सप्टेंबरपासून प्राथमिक शाळेतील मुलांच्या शाळा सुरू होत आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून प्राथमिक शाळेतील मुलांच्या संरक्षणासाठी शाळा स्वच्छ करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी मैदानात सर्कल बनविली गेली आहेत. मुलांना फक्त या सर्कलवर चालत जावे लागते. त्याच वेळी सुमारे 12 मुलांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनानं जारी केलेल्या एसओपीमध्ये पाकिस्तान सरकारने असेही म्हटले होते की, शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनंतर नियमितपणे येणा-या सर्वांची कोरोना चाचणी घेतली जाईल. कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांचा यात समावेश आहे. मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचा अवलंब केला आहे. शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 48 तासांच्या आत सरकारने कोरोनासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केलेल्या शाळांवर कारवाई सुरू केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणा-या 32 शाळा 32 तासांच्या आत सील करण्यात आल्या.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन्स सेंटरला (एनओसीसी) सांगण्यात आले होते की, पहिल्या 48 तासांत बंद झालेल्या 22 संस्थांपैकी 16 संस्था खैबर पख्तुनखा भागातील आहेत. सीलबंद शाळा महाविद्यालयांपैकी पाच ही पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) आणि एक इस्लामाबादची आहे. त्याचबरोबर सिंध सरकारने अशा 10 शाळा सीलबंद केल्या आहेत ज्या कोरोनाविषयी जारी केलेल्या एसओपीला स्वीकारत नाहीत. याशिवाय कोविडची येथेही 19 प्रकरणे नोंदली गेली.

कोरोना संकटातील पाकिस्तानच्या कामगिरीचं जगभर कौतुक होत आहे. अगदी डब्ल्यूएचओनेही पाकिस्तानचे कौतुक केले होते आणि असे म्हटले होते की, त्यांनी कोरोना संसर्ग कसा नियंत्रित केला आहे हे संपूर्ण जगाने पाकिस्तानकडून शिकले पाहिजे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाक सरकारने शाळा-महाविद्यालयांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शक सूचना तयार केली होती आणि काटेकोरपणे त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय वर्गखोल्यांमध्ये शिकवण्याची व्यवस्था व अध्यापन करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना वर्गातील मास्क काढण्याची परवानगी नाही. कोणताही विद्यार्थी आपली कोणतीही गोष्ट आपापसांत सामायिक करू शकत नाही. त्याशिवाय प्रवेशद्वाराजवळ त्याचे तापमान थर्मल गनने मोजले जात आहे. प्राथमिक मुलांकडून कर्मचार्‍यांना सामाजिक अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी कर्तव्य बजावण्यास सांगण्यात आले आहे, ज्यात मुलांचे निरीक्षण करावं लागत आहे. 
 

Web Title: Primary school in Pakistan will start from September 30, special preparation for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.