दहशतवाद्यांना फाशी देण्यासाठी दबाव
By Admin | Updated: December 24, 2014 02:06 IST2014-12-24T02:06:59+5:302014-12-24T02:06:59+5:30
पेशावर येथील लष्करी शाळेवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांसाठी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली आहे

दहशतवाद्यांना फाशी देण्यासाठी दबाव
कराची : पेशावर येथील लष्करी शाळेवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांसाठी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली आहे. त्यानंतर पाक सरकारने मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या सर्व म्हणजेच ५०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना फाशी देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नागरिक या दहशतवाद्यांना जाहीर शिक्षा द्यावी अशी मागणी करत सरकारवर दबाव आणत आहेत. पण अॅम्नेस्टी ही जागतिक मानवी हक्क संघटना मात्र या वृत्तामुळे अस्वस्थ झाली आहे.
पाकिस्तान सरकारने फाशीवरील बंदी उठवल्यापासून सहा दहशतवाद्यांना मृत्युदंड दिला गेला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी या दहशतवाद्यांचे दयाअर्ज फेटाळले होते. पाकिस्तानातील नागरी संघटना या दहशतवाद्यांना जाहीर फाशी द्यावी अशी मागणी करत आहेत. कराची प्रेस क्लबवर सोमवारी नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढला होता. या निदर्शकांच्या हातात तालिबानविरोधी फलक होते. (वृत्तसंस्था)