शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बायडेन थेट युक्रेन युद्धभूमीत! रशियाला अंधारात ठेवले; जेलेन्स्कींची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 10:57 IST

सोमवारी युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता कीव्ह शहरातील भोंगे अचानक अधिक जोरात वाजू लागले

कीव्ह :  युक्रेनच्या युद्धाला येत्या २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार असून, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला सोमवारी अचानक भेट दिली व सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. युक्रेनच्या पाठीशी अमेरिका भक्कमपणे उभी आहे, हे बायडेन यांनी आपल्या युक्रेन दौऱ्यातून रशियाला दाखवून दिले. बायडेन यांच्या भेटीबद्दल विलक्षण गुप्तता पाळण्यात आली होती.

सोमवारी युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता कीव्ह शहरातील भोंगे अचानक अधिक जोरात वाजू लागले. हवाई हल्ला होण्याची शक्यता असेल तर अशा पद्धतीचे भोंगे वाजविले जातात, हे आता तेथील नागरिकांच्या सवयीचे झाले आहे; पण सोमवारी कीव्हमधील सर्व प्रमुख रस्ते नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. 

युक्रेन ताठ मानेने उभा आहेरशियाने एक वर्षापूर्वी आक्रमण केल्यानंतर काही काळ धास्तावलेले कीव्ह आता पुन्हा खंबीरपणे उभे ठाकले आहे. युक्रेन व तेथील लोकशाही ताठ मानेने उभी आहे व आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांचा समर्थपणे मुकाबला करत आहे. अमेरिका ही नेहमीच युक्रेनच्या बाजूने उभी राहील. युक्रेनला ५० कोटी डॉलरची अतिरिक्त मदत देण्यात येईल.- जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

पोलंडमधून ट्रेनने गेले युक्रेनला...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वॉशिंग्टनमधून स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे सव्वाचार वाजता एअर फोर्स वन या विमानाने युक्रेनला यायला निघाले. वाटेत ते जर्मनीच्या रॅमस्टिन हवाई तळावर काही वेळ थांबले. त्यानंतर त्यांचे विमान पोलंडमध्ये दाखल झाले.  nसोमवारी पोलंडच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता ते वॉर्सा रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथून त्यांनी ट्रेनने युक्रेनपर्यंतचा एक तासाचा प्रवास केला. त्यानंतर ते कीव्हमध्ये जेलेन्स्की यांना भेटले.

लोकांमध्ये आश्चर्यकाहीतरी विशेष घडणार असल्याचा नागरिकांना अंदाज आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांना भेटण्यासाठी कीव्हमध्ये आल्याचे कळताच लोक आश्चर्यचकित झाले. कीव्हमधील ऐतिहासिक चर्च रोडवर कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. बायडेन युक्रेनमध्ये सुमारे पाच तास होते. 

कोणालाही न सांगता युद्धक्षेत्रात गेलेले अमेरिका अध्यक्ष...

२००३  तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश ख्रिसमसच्या आठवड्यात इराकला पोहोचले. बुश यांना त्यांच्या सुरक्षा युनिटने परवानगी दिली नसतानाही ते तिथे पोहोचले.२०१०तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अफगाणिस्तानची राजधानी काबूलला पोहोचले. येथे त्यांनी अमेरिकन सैनिकांची भेट घेतली आणि त्यांना भेटवस्तू दिल्या.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया