शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेच्या सूपमध्ये आढळला उंदीर, रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यानं दिली अजब ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 13:21 IST

एका गर्भवती महिलेच्या सूपमध्ये उंदीर आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रेस्टॉरंटला टाळं ठोकण्याची वेळ आली आहे.

बीजिंग - एका गर्भवती महिलेच्या सूपमध्ये उंदीर आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रेस्टॉरंटला टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. चीनमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील हा किळसवाणा प्रकार आहे. कहर म्हणजे याहूनही मोठा गंभीर प्रकार रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यानं केला आहे. उंदीर असलेले सूप प्यायल्यानं दाम्पत्याला गर्भातील बाळावर वाईट परिणाम होण्याची भीती वाटू लागली, यावर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यानं गर्भपात करण्यासाठी रोखरक्कम देण्याची ऑफर केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. साऊथ चायना मॉर्निग पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार,  संबंधित महिला आणि तिचा पती 6 सप्टेंबरला प्रसिद्ध जियाबु जियाबु रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना सूपमध्ये मेलेला उंदीर आढळून आला.  

गर्भाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतील, अशी भीती या दाम्पत्यानं व्यक्त केली आणि याबाबतची माहिती रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली तेव्हा त्यानं या दाम्पत्याला अजबच सल्ला दिला. महिलेच्या पतीनं सांगितले की, ''गर्भाच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता वाटत असेल तर आम्ही तुम्हाला गर्भपात करण्यास तीन हजार डॉलर देऊ शकते, असा अजब आणि संतापजनक सल्ला कर्मचाऱ्यानं दिला''.

दरम्यान, यानंतर नुकसान भरपाई म्हणून रेस्टॉरंटकडून दाम्पत्याला 728 डॉलर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, आरोग्य अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटची तपासणी केली असता त्यांना सूपमध्ये उंदीर असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाही. मात्र, अन्य नियमांचं उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानं रेस्टॉरंटला टाळं ठोकण्यात आले आहे.   

टॅग्स :chinaचीनfoodअन्नHealthआरोग्य