शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

थेरेसा मे यांच्या कॅबिनेटमधील मंत्री प्रीती पटेल यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 11:17 AM

मूळ भारतीय निवासी असलेल्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौ-यानंतर बुधवारी राजीनामा दिला आहे.

लंडन : मूळ भारतीय निवासी असलेल्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौ-यानंतर बुधवारी राजीनामा दिला आहे. आफ्रिका दौ-यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी परत बोलावले होते. प्रीती पटेल यांनी इस्रायल दौ-यात पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक अधिका-यांच्या भेटी घेतल्या होत्या. आपल्या राजीनाम्यासंदर्भात सांगताना प्रीती पटेल म्हणाल्या की, ''मंत्री परिषदेत काम करणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. तथापि, एक मंत्री म्हणून ज्या उच्च परंपरा पाळण्याचे संकेत आहेत, ते मात्र माझ्या कार्याला अनुकूल नव्हते. जे झाले त्याबद्दल मी सरकारची माफी मागते''.

नेमके काय घडले?प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यातील इस्रायलमध्ये झालेल्या बैठकांनंतर पुन्हा 7 सप्टेंबर रोजी इस्रायलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गिलाड एर्डेन यांची लंडनमध्ये तर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी युवल रोटेम यांची न्यू यॉर्कमध्ये भेट घेतली अशी माहिती समोर आली. इस्रायलच्या बैठकांमध्ये कोणतेही ब्रिटिश अधिकारी उपस्थित नव्हते किंवा पटेल यांनी या बैठकांची योग्य नियमांनुसार कोणतीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली नव्हती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासह अनेक इस्रायली नेते, अधिकाऱ्यांशी झालेल्या 12 हून अधिक बैठकांबाबत पटेल यांनी योग्य स्पष्टीकरण न दिल्याबद्दल त्यांना आता आपले पद गमवावे लागणार असे मत इंग्लंडमध्ये विविध माध्यमे व्यक्त करण्यात आले होते. पटेल यांच्या निमित्ताने इंग्लंडमधील विरोधी पक्षांना थेरेसा मे यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली. पटेल यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती आहे. त्यांनी इस्रायली नेत्यांच्या बैठका घेऊन इस्रायलला गोलन हाईटसमध्ये आर्थिक मदत देण्यासाठी बोलणी केली असा आरोप विरोधी पक्षांनी केला.

कोण आहेत प्रीती पटेल?प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल युगांडामधून आशियाई नागरिकांना हाकलण्याच्या इदी अमिन दादाच्या मोहिमेच्या थोडे आधीच इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. पटेल यांना सर्वात प्रथम डेव्हिड कॅमेरुन यांनी कॅबिनेटमध्ये संधी दिली तर थेरेसा मे यांनीही त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम ठेवले.