काबूल : अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये आज सकाळी एक शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात जवळपास 34 लोकांचा मृत्यू झाला असून 68 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वृत्त संस्था सिन्हुआनुसार दहशतवादी पुल-ए-महमूद खानमध्ये एका निर्माणाधीन इमारतीमध्ये घुसले होते. या ठिकाणी सुरक्षादलाशी त्यांची चकमकही झाली.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दहशतवाद्याने पहिल्यांदा त्यांच्या बॉम्बनी भरलेल्या कारचा स्फोट घडविला आणि पुन्हा गोळीबार सुरू केला. या भागात संरक्षण मंत्रालयाची इमारत, खेळाचे मैदान, सूचना आणि संस्कृती मंत्रालयाची एक शाखा आणि घरे आहेत. स्फोटानंतर बऱ्याच अंतरावर आवाज ऐकायला गेला होता. त्यानंतर उडालेला धूरही लांबून दिसत आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
आज झालेल्या बॉम्बहल्ल्यामुळे जवळपास दीड किमीपर्यंत हादरे जाणवले. तर रविवारी झालेल्या हल्ल्यात 26 जवान ठार झाले होते. शिवाय 8 जवान जखमी झाले होते.