शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता? संशोधकांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:01 AM

पृथ्वीबाहेरील अन्य ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध सतत सुरू असतो. चंद्रावरही जीवसृष्टी होती का, तिथे भविष्यात राहता येणे शक्य आहे का असे प्रश्न पडत असतात.

न्यू यॉर्क : पृथ्वीबाहेरील अन्य ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध सतत सुरू असतो. चंद्रावरही जीवसृष्टी होती का, तिथे भविष्यात राहता येणे शक्य आहे का असे प्रश्न पडत असतात. मात्र नासाच्या मार्स रोव्हर क्युरिओसिटी यानाला मंगळावरती काही जैविक अणू सापडले आहेत. कार्बनचा अंश असलेले बिल्डिंग ब्लॉक्सही (वीटसदृश्य ठोकळे) सापडले आहेत. त्यामुळे तेथे कधी काळी जीवसृष्टी असावी, असा अंदाज बांधला जात आहे.मंगळाचे वय साडेतीन अब्ज वर्षे असून, त्याची माहिती व संशोधन यासाठी नासाने मार्स सोव्हर क्युरिओसिटी हे यान मंगळावर पाठवले आहे.रोव्हरने दिलेल्या माहितीवर शोधनिबंध तयार करणाऱ्या जेनिफर एजिब्रोड यांनी सांगितले की, मंगळावर सापडलेल्या या गोष्टी म्हणजे तिेथे जीवसृष्टी होती, याचा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे त्याची ठोस माहिती नाही इतकेच आता म्हणता येईल.तिथे सजीव नव्हते असे अभ्यासातून लक्षात आले तरी सजीवांना खाण्यासाठी काहीतरी उपलब्ध होते, असा निष्कर्ष काढता येईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, भूगर्भीय हालचालींमुळे मिथेन निर्माण होऊ शकतो. सापडलेले पदार्थ तिथेच कायमच राहिले असून, तीच उत्साहाची बाब आहे. (वृत्तसंस्था)शक्यता नाकारता येत नाहीरोव्हरला सापडलेल्या गोष्टी जैविकदृष्ट्या तयार झाल्या होत्या, ही शक्यता नाकारता येत नाही. त्या जैविक होत्या, असेही आता खात्रीने सांगता येणार नाही. पण ती शक्यता संशोधनातून वगळली नसल्याचे नासाच्या कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)मधील वरिष्ठ संशोधक ख्रिस वेबस्टर यांनी सांगितले.

टॅग्स :Marsमंगळ ग्रह