पोर्तुगालमध्ये जंगलाला आग, ४३ जणांचा मृत्यू
By Admin | Updated: June 19, 2017 01:16 IST2017-06-19T01:16:12+5:302017-06-19T01:16:12+5:30
मध्य पोर्तुगालमध्ये जंगलाला शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने ४३ जणांचा बळी घेतला तर ५९ जण जखमी झाले आहेत.

पोर्तुगालमध्ये जंगलाला आग, ४३ जणांचा मृत्यू
पिनेला (पोर्तुगाल) : मध्य पोर्तुगालमध्ये जंगलाला शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने ४३ जणांचा बळी घेतला तर ५९ जण जखमी झाले आहेत. मृतांतील बहुतेक जण त्यांच्या कारमध्ये अडकल्यामुळे मरण पावले.
सरकारी सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार १६० वाहने आणि ६०० अग्निशमन कर्मचारी शनिवारी रात्री उशिरा आग विझवण्यासाठी पाठवण्यात आले. कोईब्रापासून ५० किलोमीटरवरील पिड्रोगाओ गँ्रड नगरपालिकेत शनिवारी दुपारी ही आग लागली. गेल्या काही वर्षांत जंगलाला लागलेली एवढी भीषण आग आम्ही बघितली नव्हती, असे या घटनेने अस्वस्थ झालेले पंतप्रधान अँटोनिआ कोस्टा म्हणाले. मृतांची संख्या वाढू शकते. पोर्तुगालमध्ये शनिवारी तापमान ४० अंशाच्या वर होते व त्यामुळे तेथे उष्णतेची लाट निर्माण झाली होती. शनिवारी रात्री संपूर्ण पोर्तुगालमध्ये जंगलांना आगीच्या सुमारे ६० घटना घडल्या.