खोटी बंदूक हाती घेतलेल्या मुलाला पोलिसांनी केले ठार
By Admin | Updated: November 25, 2014 01:26 IST2014-11-25T01:26:04+5:302014-11-25T01:26:04+5:30
खेळण्यातील खोटी बंदूक बाळगणा:या 12 वर्षाच्या मुलाचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत घडली असून, या घटनेने खळबळ माजली आहे.

खोटी बंदूक हाती घेतलेल्या मुलाला पोलिसांनी केले ठार
क्वीव्हलँड : खेळण्यातील खोटी बंदूक बाळगणा:या 12 वर्षाच्या मुलाचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत घडली असून, या घटनेने खळबळ माजली आहे. हा मुलगा शनिवारी पार्कमध्ये जमलेल्या लोकांना खोटी बंदूक दाखवत होता. त्याला पोलीस अधिका:यांनी दोन गोळ्या घातल्या. जखमी झाल्यानंतर रविवारी त्याचा मृत्यू झाला.
तामिर राईस असे या मुलाचे नाव असून मुलाचे वडील ग्रेगरी अँडरसन यांनी या हत्येचा निषेध केला आहे. पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यासाठी 9-11 कॉल देण्यात आला होता. कडेल रिक्रिएशन सेंटरच्या बाहेर हा मुलगा खेळण्यातील बंदूक हातात घेऊन खेळत होता. तामिर झोपाळ्यावर बसला होता व बंदूक हातात घेऊन पाहत होता. बंदूक खोटी होती; पण आजुबाजूच्या लोकांना घाबरवण्यासाठी पुरेशी होती. या मुलाला टेजर या नावाने ओळखला जाणारा संदेश न देताच पोलिसांनी गोळीबार केला. धोका जर जास्त नसेल तर पोलीस संशयिताला सूचना देण्यासाठी विद्युत शॉक देणारे उपकरण वापरतात. मुलाला जखमी अवस्थेत मेट्रो हेल्थ मेडिकल सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. तिथे रविवारी तो मरण पावला. (वृत्तसंस्था)