शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अमेरिकेत सापडलेला मृतदेह भारतातून दत्तक घेतलेल्या मुलीचाच, पोलिसांनी दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 11:21 IST

अमेरिकेच्या रिचर्डसनमधून सोमवारी पोलिसांना एका मुलीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह भारतातून दत्तक घेण्यात आलेल्या मुलीचा असल्याचं सिद्ध झालं आहे.

ठळक मुद्देअमेरिकेच्या रिचर्डसनमधून सोमवारी पोलिसांना एका मुलीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह भारतातून दत्तक घेण्यात आलेल्या मुलीचा असल्याचं सिद्ध झालं आहे. सोमवारी मॅथ्युज दाम्पत्याच्या घरापासून १ किमी अंतरावरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या एका बोगद्यात एका मुलीचा मृतदेह सापडला.

ह्युस्टन- अमेरिकेच्या रिचर्डसनमधून सोमवारी पोलिसांना एका मुलीचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह भारतातून दत्तक घेण्यात आलेल्या मुलीचा असल्याचं सिद्ध झालं आहे. सोमवारी मॅथ्युज दाम्पत्याच्या घरापासून १ किमी अंतरावरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या एका बोगद्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह शेरीलचाच असावा, असा पोलिसांना संशय होता. तो संशय खरा ठरला असून दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या शेरीनचा तो मृतदेह असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तो मृतदेह शेरीनचा असल्याचं सिद्ध होताच पोलिसांनी शेरीनच्या वडिलांना अटक केली. जबरदस्ती दूध प्यायला दिल्याने शेरीनचा श्वास अडकला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची कबूली शेरीनच्या वडिलांनी दिली. त्यानंतर शेरीनच्या मृतदेहाचा बंदोबस्त केल्याचं त्याने सांगितलं आहे. मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी पोलिसांनी वेस्ली मॅथ्यूला अटक केली. 

‘शेरीनला खोकला येऊ लागला. तिचा श्वास मंदावला. वेस्लेला तिच्या हाताची नाडीही जाणवत नव्हती. तिचा मृत्यू झाला, असा त्याचा समज झाला’ असं वेस्लेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तीन वर्षांच्या लेकीच्या मृत्यूप्रकरणी वेस्ले मॅथ्यूजला सोमवारी अटक करण्यात आली.  वेस्लेच्या पत्नीवर गुन्हेगारी ठपका ठेवण्यात आलेला नाही. शेरील गायब झाली, त्यावेळी आपण झोपल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. लहान मुलाला गंभीर इजा केल्याप्रकरणी सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.

वेस्लेचा बनाव

शेरीन दूध पित नसल्यामुळे आपण तिला पहाटे तीन वाजता घराबाहेर झाडाखाली उभं राहण्यास सांगितलं. 15 मिनिटांनी तिला पाहण्यासाठी बाहेर आलं असता, ती कुठेच दिसली नाही, असा दावा वेस्लेने केला होता. ही घटना घडून पाच तास उलटल्यानंतरही त्याने शेरीन बेपत्ता असल्याची तक्रार दिली नसल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या होत्या.

नेमकं प्रकरण काय?मूळचे केरळचे असलेल्या विस्ले (३७) व सिनी मॅथ्युज या दाम्पत्याने भारतातून शेरीन या मुलीला दत्तक घेतलं होतं. शेरीन दूध पित नसल्याने संतापलेल्या विस्ले याने शिक्षा म्हणून तिला एकटीला ७ ऑक्टोबरच्या पहाटे तीनच्या सुमारास घरामागील मोकळ्या जागेत उभं ठेवलं. रिचर्डसन शहरातील या भागात कोल्हे व जंगली कुत्र्यांचा वावर असतो, याची जाणीव असूनही या पित्याने तिला ही शिक्षा दिली. तेव्हापासून शेरीन बेपत्ता झाली होती. टेक्सास पोलिसांना सोमवारी मॅथ्युज दाम्पत्याच्या घरापासून १ किमी अंतरावरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या एका बोगद्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह शेरीलचाच असावा, असा पोलिसांना संशय होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी विसले याला अटक केली व अडीच लाख डॉलरच्या जातमुचलक्यावर सुटका केली. घटनेप्रसंगी शेरीलची आई सिनी झोपलेली होती. 

टॅग्स :Deathमृत्यूAmericaअमेरिका