इस्तंबूलमध्ये महिला दहशतवाद्यांचा पोलीस बसवर हल्ला
By Admin | Updated: March 3, 2016 16:45 IST2016-03-03T16:45:31+5:302016-03-03T16:45:31+5:30
तुर्कस्तानमधील इस्तंबूलमध्ये पोलिसांवर हल्ला करणा-या दोन महिला दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे

इस्तंबूलमध्ये महिला दहशतवाद्यांचा पोलीस बसवर हल्ला
>ऑनलाइन लोकमत -
इस्तंबूल, दि. ४ - तुर्कस्तानमधील इस्तंबूलमध्ये पोलिसांवर हल्ला करणा-या दोन महिला दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे. पोलिसांच्या बसवर हा हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही महिला दहशतवाद्यांना ठार केले आहे. या हल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाच्या बसवर हा हल्ला करण्यात आला. बसवर फायरिंग करत ग्रेनेड फेकण्यात आलं . बस स्टेशनला पोहोचत असतानाच हा हल्ला झाला. हल्लेखोरांपैकी एका महिलेने फायरिंग केली तर दुस-या महिलेने बसच्या दिशेने ग्रेनेड फेकलं. पोलिसांनी हल्याला प्रत्युत्तर देतं फायरिंग केली तेव्हा त्यात एक महिला जखमी झाली. हल्लेखोर महिला शेजारच्या एका इमारतीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व इमारत खाली करण्यात आली होती. पोलिसांच्या विशेष पथकाने दोन्ही महिला दहशतवाद्यांना ठार केलं आहे. या हल्याची जबाबदारी अजून कोणीही घेतलेली नाही.