शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

लंडन पोलिसांना म्हणाल्या पॅलेस्टाईन समर्थक, आता गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी; ऋषी सुनक यांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 15:10 IST

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना पदावरुन हटवले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना पदावरुन हटवले आहे. सुएला ब्रेव्हरमन यांनी त्यांच्या एका लेखात लंडन पोलिसांवर पॅलेस्टाईनशी संबंधित आरोप केले होते, त्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. यानंतर पीएम ऋषी सुनक यांच्यावर मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी दबाव होता.

भयावह! "मला सोडा, उद्या माझी शाळा आहे..."; दहशतवाद्यासमोर मुलीची विनवणी, पण त्याने...

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना पदावरुन हटवले आहे. सुएला ब्रेव्हरमन यांनी त्यांच्या एका लेखात लंडन पोलिसांवर पॅलेस्टाईनशी संबंधित आरोप केले होते, त्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. यानंतर पीएम ऋषी सुनक यांच्यावर मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी दबाव होता.

सुएला ब्रेव्हरमन यांच्या लेखामुळे मोठा वाद सुरू झाला होता. दरम्यान, आता त्यांना पदावरुन हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी लंडनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने आयोजित करण्यात आली होते, यात पोलिसांनी निदर्शने ज्या पद्धतीने थांबवले त्याबद्दल मंत्री सुएला ब्रेव्हरमन संतापल्या होत्या. त्यांनी एका लेखात  पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने दडपण्याच्या लंडन पोलिसांच्या पद्धतींवर टीका करताना ऋषी सुनक यांना लक्ष्य केले होते.

या लेखाने उजव्या विचारसरणीच्या निदर्शकांना लंडनच्या रस्त्यावर उतरण्यास प्रोत्साहित केले. वाढता विरोध पाहून सुनक सुएला यांच्यावर कारवाईसाठी वाढता दबाव आणत होते आणि त्याच दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलात सुएला यांना बडतर्फ केल्याची बातमी समोर आली आहे.

सुएला ब्रेव्हरमन यांच्या आणखी एका विधानाने खळबळ उडवून दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ब्रिटीश शहरांमध्ये फूटपाथवर राहणारे लोक तेथे त्यांच्या स्वतःच्या इच्छेने राहतात आणि ही त्यांची जीवनशैली निवड आहे. त्यांच्या ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते, 'ब्रिटनचे लोक दयाळू आहेत. जे खरोखर बेघर आहेत त्यांना आम्ही नेहमीच आधार देऊ. परंतु आम्ही आमचे रस्ते लोकांच्या तंबूंच्या पंक्तींनी ताब्यात घेऊ देणार नाही, ज्यापैकी बरेच लोक परदेशातून आले आहेत. हे लोक त्यांच्या जीवनशैलीचा पर्याय म्हणून रस्त्यावर राहतात.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकLondonलंडन