शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला; चर्चेनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:49 IST

PM Modi Donald Trump: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याची माहिती दिली. 

PM Modi President Trump News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर आठवडाभराने दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी झाली. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केलं. यावेळी इमिग्रेशनच्या मुद्द्यावरही बोलणी झाली. या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असल्याचे जाहीर केले. (PM Modi held a telephonic conversation with Donald Trump)

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर येणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. व्हाईट हाऊसने यासंदर्भातील माहिती दिली. 

मोदी-ट्रम्प यांच्यात काय झाली चर्चा?

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'पीएम मोदींसोबत इमिग्रेशनच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली. दोन्ही देशांतील व्यापार आणि भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर चर्चेत भर देण्यात आला.'

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, आज (२८ जानेवारी) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून अर्थपूर्ण चर्चा झाली. दोन्ही देशातील संबंध विस्तारण्याबरोबरच अधिक घट्ट करण्यावर दोन्ही नेत्यांनी जोर दिला. इंडो-पॅसिफिक सुरक्षा, मध्य पूर्व आणि युरोप यासह स्थानिक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा केली.  

माझे मित्र ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला -मोदी

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याची माहिती दिली. 

"माझे प्रिय मित्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला. ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन केले. आम्ही विश्वासार्ह भागीदारी आणि एकमेकांच्या फायद्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी, जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करू", असा विश्वास मोदी यांनी ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर व्यक्त केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाIndiaभारत