शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:37 IST

PM Narendra Modi G7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला जाणार आहेत.

PM Narendra Modi G7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यापूर्वी कॅनडातील मार्क कार्नी यांच्या सरकारने खलिस्तानवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तान्यांना पकडण्यासाठी सरकार प्रोजेक्ट पेलिकन नावाचे ऑपरेशन राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत कॅनडाच्या पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्ज आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला असून, याचे खलिस्तान समर्थकांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

कॅनडा पोलिसांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे ड्रग्ज जप्त केले आहे, ज्यामध्ये 479 किलो कोकेनचा समावेश आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 47.9 मिलियन डॉलर्स आहे. याप्रकरणी कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या सात आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

भारतविरोधी कारवायांमध्ये वापरपोलिसांच्या मते या गटाने अमेरिका आणि कॅनडा दरम्यानच्या व्यावसायिक ट्रकिंग मार्गाचा वापर केला. त्याचे मेक्सिकन ड्रग्ज कार्टेल आणि अमेरिकन वितरकांशी संबंध होते. ड्रग्ज व्यापारातून मिळालेला पैसा निदर्शने, जनमत चाचणी आणि शस्त्रे खरेदी यासारख्या भारतविरोधी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे सांगण्यात येते. गुप्तचर संस्थांना संशय आहे की, पाकिस्तानची आयएसआय या नेटवर्कला पाठिंबा देत आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साजिथ योगेंद्रराजा (31), मनप्रीत सिंग (44), फिलिप टेप (39), अरविंदर पोवार (29), करमजीत सिंग (36), गुरतेज सिंग (36), सरताज सिंग (27), शिव ओंकार सिंग (31) आणि हाओ टॉमी हुयन्ह (27) यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींचा कॅनडा दौराही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कॅनडामधील कनानास्किस येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणानंतर त्यांचा दौरा होत आहे. शिखर परिषदेव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी आणि कार्नी यांच्यात द्विपक्षीय चर्चाही होईल. यात खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. 

तत्कालीन ट्रुडो सरकारच्या कार्यकाळात कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांचे मनोबल उंचावले होते. ट्रुडो यांच्या धोरणांमुळे भारत आणि कॅनडामधील संबंधही कमालीचे बिघडले होते. पंतप्रधान असताना, ट्रुडो यांनी खलिस्तान समर्थक निज्जरसाठी आवाज उठवला आणि कोणत्याही पुराव्याशिवाय भारतावर आरोप केले. पण, त्यानंतर ट्रुडो यांना सत्ता गमावली लागली. आता कार्नी यांच्या कार्यकाळात हे संबंध पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय