शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
2
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
3
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
4
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
5
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
6
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
7
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
8
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
9
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
10
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
11
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
12
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
13
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
14
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
16
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
17
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
18
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
19
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
20
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
Daily Top 2Weekly Top 5

G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:20 IST

PM Narendra Modi G20 : जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले.

PM Narendra Modi G20 : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले. ‘इनक्लुसिव्ह आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ’ सत्राला संबोधित करताना त्यांनी जागतिक विकासाच्या पॅरामीटर्सचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली.

विकासाच्या मॉडेलवर पीएम मोदींची टीका

PM मोदी म्हणाले की, जागतिक विकासाचे विद्यमान मॉडेल मोठ्या लोकसंख्येला संसाधनांपासून दूर ठेवतात आणि निसर्गाच्या बेबंद शोषणाला प्रोत्साहन देतात. याचा फटका आफ्रिकेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आफ्रिका जेव्हा पहिल्यांदा G20 शिखर परिषद आयोजित करत आहे, तेव्हा विकासाच्या पॅरामीटर्सवर पुन्हा विचार करण्याची हीच वेळ आहे. पंतप्रधानांनी ‘इंटिग्रल ह्यूमनिझम’चा उल्लेख करत सांगितले की मानव, समाज आणि निसर्ग यांना एकत्रित दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रगती आणि पर्यावरण यांच्यातील समतोल साधला जाऊ शकतो.

PM मोदींचे तीन प्रस्ताव

1. ग्लोबल ट्रेडिशनल नॉलेज रिपॉजिटरी

PM मोदींनी सांगितले की, जगभरात अनेक समुदाय आजही परंपरागत, पर्यावरणस्नेही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जीवनशैली जपून आहेत. त्यांच्या ज्ञानाचे दस्तावजीकरण करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी G20 अंतर्गत ग्लोबल ट्रेडिशनल नॉलेज रिपॉजिटरी निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. भारताची Indian Knowledge Systems हे या प्लॅटफॉर्मचा आधार बनू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

2. G20 आफ्रिका स्किल्स मल्टिप्लायर इनिशिएटिव्ह

PM मोदींनी आफ्रिकेच्या विकासाला जगासाठी लाभदायी ठरविताना स्किल डेव्हलपमेंटची तातडीची गरज अधोरेखित केली. त्यांनी G20-Africa Skills Multiplier उपक्रमाची घोषणा केली, ज्याअंतर्गत  ‘ट्रेन-द-ट्रेनर्स’ मॉडेल राबवले जाईल आणि यात G20 देश आर्थिक व तांत्रिक मदत करतील. याद्वारे पुढील 10 वर्षांत 10 लाख प्रमाणित प्रशिक्षक आफ्रिकेत तयार करण्याचे लक्ष्य असेल. हे प्रशिक्षक नंतर लाखो आफ्रिकन युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊ शकतील.

3. ड्रग-टेरर नेक्ससविरोधात G20 ची एकत्रित कारवाई

PM मोदींनी फेंटेनाइलसारख्या सिंथेटिक ड्रग्सच्या धोक्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी ड्रग-टेरर नेक्ससचा मुकाबला करण्यासाठी खास G20 उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. या उपक्रमाद्वारे ड्रग तस्करी रोखणे, गैरकायदेशीर पैशांच्या हालचालींवर अंकुश, दहशतवादासाठी होणाऱ्या निधी पुरवठ्याला धक्का बसवणे या उद्दिष्टांसाठी आर्थिक, सुरक्षा आणि गव्हर्नन्स टूल्स एकत्रितपणे वापरण्यात येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi critiques global development model at G20, proposes solutions.

Web Summary : PM Modi criticized current global development models at the G20 summit, highlighting their negative impacts on Africa. He proposed a traditional knowledge repository, an Africa skills initiative, and a G20 initiative against drug-terror nexus.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीG20 Summitजी-२० शिखर परिषदSouth Africaद. आफ्रिका