शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

PM नरेंद्र मोदींची 'अल-हकीम' मशिदीला भेट; 4000 शहीद भारतीय सैनिकांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 3:29 PM

PM Narendra Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इजिप्त दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध 'अल हकीम' मशिदीला भेट दिली.

PM Narendra Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेनंतर इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत. इजिप्तमध्ये शनिवारी मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. इजिप्त दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी(आज) पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध 'अल हकीम'मशिदीला भेट दिली. यावेळी दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांनी पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.

शहिदांना वाहिली श्रद्धांजलीयानंतर पंतप्रधान मोदींनी हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह येथील युद्ध स्मारकाला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये शहीद झालेल्या 4000 भारतीय सैनिकांचे स्मारक म्हणून हे स्मारक ओळखले जाते.

अल हकीम मशिदीचे भारताशी विशेष नाते 11व्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीचा भारताशीही विशेष संबंध आहे. भारताने या मशिदीच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या या मशिदीचे नूतनीकरण बोहरा समाजाने केले. दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे धर्मगुरू सय्यद मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी त्याची जबाबदारी घेतली. बुरहानुद्दीन यांचे भारताशी संबंध असून त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बोहरा समाजाचे सदस्य पंतप्रधानांच्या भेटीने खूशभारतीय वंशाच्या बोहरा समुदायाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अल-हकीम मशिदीत येथे आले आणि आम्हाला भेटले. त्यांनी आमच्या बोहरा समाजाचीही विचारपूस केली आणि आमच्याशी संवादही साधला. ते आमच्या कुटुंबातील सहस्य आहेत, असे आम्हाला वाटले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीयMuslimमुस्लीमMosqueमशिदAmericaअमेरिका