शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:35 IST

PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III देऊन सन्मानित करण्यात आले.

PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएम मोदी सध्या युरोपीयन देश सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील २३ वे नेते आहेत. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान फक्त माझा नाही, तर देशातील १४० कोटी जनतेचा आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आणि आमच्या परस्पर समंजसपणाला समर्पित करतो.

सायप्रसची राजधानी निकोसियामध्ये अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III देऊन सन्मानित केले.

हा सन्मान मैत्रीपूर्ण संबंधांना समर्पित आहे: पंतप्रधान मोदीसर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, "ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III साठी मी तुमचे (सायप्रसचे अध्यक्ष), सायप्रस सरकार आणि सायप्रसच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा सन्मान केवळ नरेंद्र मोदींसाठी नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठी आहे. त्यांच्या शक्ती आणि आकांक्षांचा हा सन्मान आहे. हा आपल्या देशाच्या वसुधैव कुटुंबकमच्या संस्कृती, बंधुता आणि विचारसरणीचा सन्मान आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना, आपल्या सामायिक मूल्यांना आणि आपल्या परस्पर समंजसपणाला समर्पित करतो."

"सर्व भारतीयांच्या वतीने, मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने हा सन्मान स्वीकारतो. हा सन्मान शांती, सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि आपल्या लोकांच्या समृद्धीप्रती असलेल्या आपल्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारत आणि सायप्रसमधील संबंधांप्रती असलेली जबाबदारी म्हणून या सन्मानाचे महत्त्व मी जाणतो आणि तो त्याच भावनेने घेतो. मला विश्वास आहे की, येणाऱ्या काळात आमची सक्रिय भागीदारी नवीन उंची गाठेल. एकत्रितपणे आपण केवळ आपल्या देशांच्या विकासाला बळकटी देऊ शकत नाही तर शांततापूर्ण आणि सुरक्षित जागतिक वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे योगदान देऊ," अशा भावना पीएम मोदींनी व्यक्त केल्या.

राष्ट्रपती भवनात अधिकृत स्वागतपंतप्रधान मोदी काल(रविवारी) तीन देशांच्या दौऱ्यावर सायप्रसला पोहोचले. या दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती क्रिस्टोडौलिड्स यांनी निकोसियातील व्यावसायिकांसोबत गोलमेज बैठकीत भाग घेतला आणि व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच, आज निकोसियातील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींचे अधिकृत स्वागत केले. सायप्रसनंतर पीएम मोदी कॅनडा आणि क्रोएशियालाही भेट देतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत