शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यू-यॉर्कमधील हल्ल्याचा नोंदवला तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 08:41 IST

न्यू-यॉर्क येथील मॅनहॅटनमध्ये एक ट्रक चालकानं पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

वॉशिंग्टन - न्यू-यॉर्क येथील मॅनहॅटनमध्ये एक ट्रक चालकानं पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरियलसमोर ही घटना घडली. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. 'दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे', असा शोक व्यक्त  करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा निषेधही नोंदवला आहे. 

 

नेमकं काय घडलं न्यू-यॉर्कमध्ये ?मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रक ड्रायव्हरनं पादचारी व सायकल लेनमधील लोकांच्या अंगावर भरधाव ट्रक चालवला. या घटनेत जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला असून कित्येकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. सेफुलो सायपोव्ह असे या हल्लेखोराचं नाव असून त्याचं वय 29 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला करण्यामागे नेमके कारण काय होते, याबाबतीच माहिती अद्यापपर्यंत हल्लेखोरानं दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून काही अंतरावरच स्टुवेन्सेंट हाय स्कूल आहे. वेळीच हल्लेखोराला अटक करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात हल्लेखोराकडून एक बनावट बंदूक आणि एक पॅलेट गनही सापडली आहे. तर काही प्रत्यक्षदर्शींनी पाच-सहा राऊंड गोळीबाराचा आवाजही ऐकला.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. 'आता पुरे झाले, आयसिसला अमेरिकेत येऊ देणार नाही. घटना अतिशय दुर्देवी असून पुन्हा विकृत मानसिकतेतून झालेला हा भ्याड हल्ला आहे', असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.   

 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी