शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सत्ताधारी नेत्याच्या हत्येचा कट उधळला; रशियानं केला दावा, नाव मात्र उघड केलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 08:46 IST

भारतातील सत्ताधारी पक्षातील एका नेत्याची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या करण्याचा कट आखणाऱ्या इसीस संघटनेच्या दहशतवाद्याला पकडल्याचा दावा रशियाने केला आहे.

मॉस्को :

भारतातील सत्ताधारी पक्षातील एका नेत्याची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या करण्याचा कट आखणाऱ्या इसीस संघटनेच्या दहशतवाद्याला पकडल्याचा दावा रशियाने केला आहे. हा दहशतवादी मध्य आशियातील रहिवासी आहे. कोणत्या भारतीय नेत्यावर हल्ला करण्यात येणार होता, त्याचे नाव मात्र रशियाने उघड केलेले नाही.

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे की, इसीस या संघटनेच्या एका दहशतवाद्याने भारतातल्या सत्ताधारी पक्षातील एका नेत्याची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी हा दहशतवादी भारतात येणार होता. मात्र, त्या हालचालींचा सुगावा लागताच त्याला अटक करण्यात आली. इसीसने त्याला आत्मघाती हल्ला करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले होते. या दहशतवाद्याचे नाव रशियाने जाहीर केलेले नाही.भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी विशिष्ट धर्माचा अवमान करणारी वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.

अशीच कारवाई भाजपचे एक नेते नवीनकुमार यांच्यावरही करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यांचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले होते. या पार्श्वभूमीवर भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या हत्येचा कट रशियाने एका दहशतवाद्याला पकडून उधळला ही घडामोड महत्त्वाची ठरते.  

टॅग्स :russiaरशियाTerrorismदहशतवाद